Join us

फ्लिपकार्टमध्ये केली नोकरी; एका आयडीयाने नशीबचं पालटलं, उभी केली ९९,४४४ कोटींची कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 18:09 IST

भारतासारख्या विकसनशील देशात ऑनलाईन पेमेंट्ससाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या अ‍ॅपच्या यादीत 'Phonepay' हे नाव पहिल्या स्थानावर येतं.

Success Story : युपीआई पेमेंट क्षेत्रात आजवर ज्या कंपन्यांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे त्यामध्ये फोनपेचं नाव मोठ्या आदरानं घेतलं जातं. फोनपे देशातील प्रमुख डिजीटल फाइनांशिअल प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. याच्या माध्यमातून दिवसभरात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार केले जातात. साधारणत: २०१५ समीर निगम यांनी राहुल चारी आणि काही अभियंत्यांच्या साहाय्याने डिजीटल क्षेत्रात पाऊल ठेवलं. याआधी त्यांनी डिजीटल मीडिया डिस्ट्रीब्यूशन  'Mime' ३६० प्लॅटफॉर्मची स्थापना केली होती. त्यानंतर २०११ मध्ये या कंपनीवर फ्लिपकार्टने ताबा मिळवला.

फ्लिपकार्टने मिळवला ताबा - 

फोनपे आणि फ्लिपकार्टमध्ये जवळपास २० दशलक्ष डॉलर इतक्या किंमतीत भागीदारी करण्यात आली. हीच संधी फोनपेच्या यशामध्ये मैलाचा दगड ठरली.  २०१८ मध्ये वॉलमार्टने  फ्लिपकार्टचे सगळे शेअर्स खरेदी केले. त्यानंतर या दोन कंपन्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे फोनपे कंपनीचा मार्ग मोकळा झाला. 

फोनपे हा एक क्रॉस-बॉर्डर 'UPI' पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देणारा प्लॅटफॉर्म आहे. ग्राहक तसेच व्यवसायिकांसाठी फोनपे एक आर्थिक देवाघेवाण करण्याचं माध्यम खुलं करुन देतो. डिजिटल वॉलेट आणि युपीआय पेमेंट यांसारख्या सेवांसोबत फोनपेची ऑफर आधारलेली आहे. या ऑनलाईन अ‍ॅपमुळे पैशांची देवाण-घेवाण  लाईट बिल यांसारखी महत्वाची काम अगदी सहजरित्या साध्य होतात. 

गतवर्षी केलं गेलं पिनकोड लॉंचिंग -

जागतिक बाजारपेठेत फोनपे हा हायपरलोकल कॉमर्स तसेच शॉपिंग अ‍ॅप म्हणून ओळखला जातो. २०२३ मध्ये फोनपे कंपनीने त्याचा पिनकोड लॉंच केला. त्यामुळे वापरकर्त्यांना वेगवेगळ्या सोयी- सुविधांचा सहज लाभ घेता येतो. तसेच व्यवसायिकांसाठी फोनपे पेमेंट गेटवे, ऑफलाइन पेमेंट उत्पादनं, फोनपे स्विच फिचर, जाहिरात उपाय आणि व्यापारी कर्ज या सेवा प्रदान करण्याचं काम  केलं जातं. 

फोनपेसारख्या डिजीटल पेमेंट अ‍ॅपची स्थापना करण्यापूर्वी समीर निगम यांनी फ्लिपकार्टच्या अभियांत्रिकी विभागात काम केल्याचं सांगितलं जातं. तसेच निगम शॉपझिला नावाच्या कंपनीत उत्पादन संचालकही होते.

नोव्हेंबर २०२३ पर्यंत फोनपेचे संपूर्ण भारतातील ५० कोटींहून अधिक वापरकर्ते असल्याची माहिती आहे. हे ऑनलाईन अ‍ॅप ३.७ कोटी व्यापाऱ्यांना आर्थिक सेवा पुरवते. गेल्या काही वर्षांत कंपनीची मार्केट व्हल्यू कमालीची वाढली असून डिसेंबर २०२३ पर्यंत १२ अब्ज डॉलर म्हणजे सुमारे ९९,४४४ कोटी रुपये इतकी वाढली आहे. 

टॅग्स :व्यवसायप्रेरणादायक गोष्टी