Join us

वैद्यकीय शिक्षणाचे धडे देत धरली व्यवसायाची वाट; वाचा देशातील सर्वात श्रीमंत डॉक्टरची कहाणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 15:15 IST

मनामध्ये जिद्द आणि यश मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची तुमची तयारी असेल तर काहीच अशक्य नसतं.

Success Story: मनामध्ये जिद्द आणि यश मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची तुमची तयारी असेल तर काहीच अशक्य नसतं. आयुष्यात सक्सेस मिळवायचा हाच फंडा आहे. त्यासाठी प्रचंड मेहनत आणि ध्येयासाठी आतोनात झटण्याची इच्छाशक्ती असावी लागते. असे फार कमी लोक सापडतील ज्यांच स्वप्न पूर्ण होतं. आज अशाच एका उद्योजकाच्या संघर्षाची यशोगाथा आपण जाणून घेणार आहोत. ज्यांनी कठोर मेहनत करत देशातील सर्वात श्रीमंत डॉक्टरांच्या यादीत स्थान मिळवलं. डॉ. अरविंद लाल असं त्यांच नाव आहे.  डॉ. लाल यांनी जवळपास ७५ वर्षांपूर्वी मेडिकल क्षेत्रात क्रांती घडवण्याचं ठरवलं. साधारणत: १९४९ ची ही गोष्ट आहे. रूग्णांची सेवा करत असताना मेडिकलचं शिक्षण पूर्ण करत त्यांनी व्यवयासाची कास धरली. भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच त्यांनी आपल्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. वयाच्या २८ व्या वर्षी उद्योगजतात त्यांनी पाऊल ठेवलं. सध्याच्या घडीला या कंपनीची मार्केट व्हल्यू १५ हजार कोटी इतकी असल्याचं सांगण्यात येतं. आज पॅथोलॉजी क्षेत्रामध्ये मिळणाऱ्या उत्तम सेवांमध्ये लाल पॅथलॅबचे नाव अग्रस्थानी आहे.

अशी सुचली कल्पना-

तरूण वयात असतानाच डॉ.लाल याच्या वडिलांच निधन झालं. त्यावेळेस ते पुण्यात एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या मुलांना पॅथोलॉजीचे लेक्चर देत असत. तो काळ असा होता जेव्हा लोकांना कोणत्याही तपासणीसाठी शेकडो मील अंतर कापत पायपीट करत तपासणीसाठी यावं लागायचं. तेव्हा त्यांची भेट एक वयोवृद्ध माणसाशी झाली. तो माणूस सकाळी रिकाम्यापोटी रक्तातील साखरेच प्रमाण किती आहे? हे तपासण्यासाठी आला होता. तेव्हाच त्यांच्या डोक्यात ही संकल्पना घोंगाऊ लागली.  

ज्यावेळी भारतीयांना पॅथोलॉजी लॅब हा शब्दच ज्ञात नव्हता त्या दरम्यान त्यांनी  पॅथोलॉजीही संकल्पना भारतीयांमध्ये रुजवली. आजला भारतामध्ये त्यांच्या १५० हून अधिक लॅब आहेत.  

ब्रिगेडियर उपाधीने सन्मान-

अगदी सुरूवातीपासूनच डॉ लाल यांना मेडिकल पॅथोलॉजीच्या आधुनिकतेवर विश्वास होता. भारतीय आधुनिक प्रयोगशाळेचे मुळ रोवण्याचा मानस डॉ लाल यांना मिळतो. या क्षेत्रात त्यांच नाव मोठ्या आदरानं घेतलं जातं. प्रारंभीच्या काळामध्ये  पब्लिक पार्टनरशिप तत्वावर त्यांनी पहिली प्रयोगशाळा  स्थापन केली. अरविंद लाल यांनी हा व्यवसाय मोठ्या चातुर्याने पुढे नेला. मेडिकल क्षेत्रातील योगदानाबद्दल भारतीय हवाई दलाने त्यांनी मानाची ब्रिगेडियर ही उपाधी दिली. 

२०२३ मध्ये फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीत देशातील अब्जाधीशांच्या लिस्टमध्ये त्यांचा समावेश होता. त्यावेळी डॉ. लाल यांच्याकडे ९००० कोटी रुपयांची संपत्ती होती. २०२१ मध्ये फोर्ब्सच्या यादीत ८७ व्या क्रमांकावर होतं. लाल पॅथोलॉजी लॅब संपूर्ण आशिया खंडात नावाजलेली आहे. 

टॅग्स :व्यवसायप्रेरणादायक गोष्टी