Join us  

Fuel Price Hike: पेट्रोल, डिझेलच्या खरेदीवर 'ही' ई वॉलेट देत आहेत बंपर कॅशबॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2018 3:44 PM

Fuel Price Hike: गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत काही ई वॉलेट्सकडून ऑफर्सच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या खरेदीवर बंपर सूट देण्यात येत आहे.

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. डिझेलचे दर वाढत असल्याने मालवाहतूक महाग होऊन अन्य वस्तूंची महागाईसुद्धा वाढत आहे. अशा परिस्थितीत काही ई वॉलेट्सकडून ऑफर्सच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या खरेदीवर बंपर सूट देण्यात येत आहे. PhonePe, Pauytm, Mobikwik या ई वॉलेट कंपन्या पेट्रोलच्या खरेदीवर मोठी सूट देत आहेत. जत तुम्ही PhonePe च्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेल खरेदी करत असाल तर तुम्हाला दररोज 40 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकेल. इंडियन ऑयल किंवा हिंदुस्तान पेट्रोलियमच्या पेट्रोलपंपावर तुम्ही PhonePeच्या माध्यमातून 100 किंवा त्याहून अधिक रुपयांचे पेंमेट केले तर तुम्हाला 40 रुपयांचा कॅशबॅक मिळू शकेल. मात्र हा लाभ दिवसातून एक वेळाच मिळू शकेल. या माध्यमातून मिळणाऱ्या कॅशबॅकचा वापर पुढच्या ट्रान्झॅक्शनसाठी करता येणार आहे.    Paytm सुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या खरेदीवर भरघोस कॅशबॅक देत आहे. जर तुम्ही पेट्रोल पंपावर Paytm अॅपच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलचे पेमेंट केले तर तुम्हाला 7 हजार 500 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकेल. ही ऑफर 2019 पर्यंत सुरू राहणार आहे. मात्र या ऑफरचा लाभ घेण्यासाठी निवडक पेट्रोल पंपावर कमीत कमी 50 रुपयांचे पेमेंट करावे लागेल. त्यानंतर तुम्ही 7 हजार 500 च्या कॅशबॅक स्कीममध्ये सहभागी होऊ शकाल.तसेच तुम्ही Mobikwik च्या माध्यमातून पेट्रोलपंपावरून 50 रुपयांचे पेट्रोल किंवा डिझेल खरेदी केले तर तुम्हाला एका महिन्यामध्ये 25 टक्क्यांपर्यंत सुपरकॅश मिळू शकेल. ही ऑफर 31 डिसेंबरपर्यंत वैध असेल. यामध्ये सुपरकॅशची लिमिट 100 रुपयांपर्यंत आहे.  

टॅग्स :पेट्रोलइंधन दरवाढडिझेलपे-टीएम