Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाजाराची सपाट सुरुवात! अर्थमंत्र्यांच्या भाषणापूर्वी सेन्सेक्स-निफ्टी अस्थिर; गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 10:13 IST

Stock Market : रविवार, १ फेब्रुवारी रोजी, बजेट ट्रेडिंगच्या दिवशी भारतीय शेअर बाजार सपाट उघडला. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी ५० या प्रमुख बेंचमार्क निर्देशांकांनी हिरव्या रंगात व्यवहार सुरू केले.

Stock Market : आज रविवारी, १ फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या 'केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७' च्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात काहीशी संथ आणि अस्थिर झाली. सुट्टीच्या दिवशीही विशेष सत्र सुरू असताना, बाजार सुरुवातीला हिरव्या निशाणीत उघडला खरा, पण अवघ्या काही मिनिटांतच गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याने दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी लाल निशाणीत धाव घेतली.

तेजीकडून घसरणीकडेसकाळी ९:१५ वाजता बाजार उघडला तेव्हा सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये किरकोळ वाढ दिसून आली.सेन्सेक्स: ११९.१९ अंकांच्या (०.१४%) वाढीसह ८२,३८८.९७ वर ओपन झाला.निफ्टी: १३.१० अंकांच्या (०.०५%) वाढीसह २५,३३३.७५ वर ओपन झाला.

मात्र, अवघ्या १५ मिनिटांतच ही तेजी ओसरली. सकाळी ९:२१ वाजेपर्यंत सेन्सेक्स १५ अंकांनी घसरून ८२,२८५ वर, तर निफ्टी ३८ अंकांच्या घसरणीसह २५,२८२ च्या पातळीवर व्यवहार करत होता. अर्थमंत्र्यांच्या भाषणापूर्वी गुंतवणूकदार 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

आजच्या सत्रातील सुरुवातीचे 'हिरो' आणि 'झिरो'बीएसईवरील टॉप गेनर्ससन फार्मा, ॲक्सिस बँक, पॉवरग्रिड आणि एचडीएफसी बँक हे शेअर्स सुरुवातीला वधारले होते.

बीएसईवरील टॉप लूजर्सटाटा स्टील, एटरनल, टेक महिंद्रा आणि बजाज फिनसर्व्ह या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसून आला.

वाचा - आधी पडझड, मग जोरदार उसळी! यंदाही शेअर बाजारात असाच 'हाय व्होल्टेज' ड्रामा रंगणार?

शुक्रवारच्या घसरणीचे सावट कायम?गेल्या शुक्रवारीही (३० जानेवारी) बाजारात नकारात्मक वातावरण होते. सेन्सेक्स २९६ अंकांनी, तर निफ्टी ९८ अंकांनी घसरून बंद झाला होता. शुक्रवारी टाटा स्टील आणि आयसीआयसीआय बँक यांसारख्या मोठ्या शेअर्सनी बाजाराला खाली खेचले होते. आज बजेटमध्ये पायाभूत सुविधा आणि करांबाबत होणाऱ्या घोषणांवरच बाजाराची पुढील दिशा अवलंबून असेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Market opens flat before budget; investors anxious, Sensex-Nifty volatile.

Web Summary : Stock market volatile pre-budget. Sensex, Nifty initially rose, then fell. Investors await announcements on infrastructure and taxes after Friday's decline. Focus on 'wait and watch'.
टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूकनिर्देशांकनिफ्टी