Union Budget
Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > बजेटच्या भाषणात निर्मला सीतारमण यांची 'विराट' खेळी! सलग ९ व्या अर्थसंकल्पाने मोडली ७५ वर्षांची परंपरा

बजेटच्या भाषणात निर्मला सीतारमण यांची 'विराट' खेळी! सलग ९ व्या अर्थसंकल्पाने मोडली ७५ वर्षांची परंपरा

Budget 2026 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावावर वेळेनुसार सर्वात लांब केंद्रीय अर्थसंकल्पीय भाषण देण्याचा विक्रम आहे, कारण त्यांचे २०२० चे अर्थसंकल्पीय भाषण दोन तास आणि ४२ मिनिटे चालले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 14:27 IST2026-02-01T13:26:28+5:302026-02-01T14:27:51+5:30

Budget 2026 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावावर वेळेनुसार सर्वात लांब केंद्रीय अर्थसंकल्पीय भाषण देण्याचा विक्रम आहे, कारण त्यांचे २०२० चे अर्थसंकल्पीय भाषण दोन तास आणि ४२ मिनिटे चालले होते.

Budget 2026 : Nirmala Sitharaman Spoke For 1 Hour, 25 Minutes. Check Longest & Shortest Speeches So Far | बजेटच्या भाषणात निर्मला सीतारमण यांची 'विराट' खेळी! सलग ९ व्या अर्थसंकल्पाने मोडली ७५ वर्षांची परंपरा

बजेटच्या भाषणात निर्मला सीतारमण यांची 'विराट' खेळी! सलग ९ व्या अर्थसंकल्पाने मोडली ७५ वर्षांची परंपरा

Budget 2026 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत आपला सलग ९ वा अर्थसंकल्प सादर केला. १ तास २५ मिनिटांच्या या भाषणाने केवळ देशाच्या अर्थव्यवस्थेची दिशा स्पष्ट केली नाही, तर ७५ वर्षांपासून चालत आलेली एक मोठी संसदीय परंपराही मोडीत काढली. भारताचा आर्थिक प्रवास स्थैर्य, वृद्धी आणि मध्यम महागाईच्या मार्गावर असल्याचे सांगत, सीतारमण यांनी यंदा आपल्या भाषणाच्या रचनेत ऐतिहासिक बदल केला आहे.

७५ वर्षांची परंपरा खंडित : 'पार्ट बी' बनला केंद्रबिंदू
भारतीय अर्थसंकल्पाच्या इतिहासात सहसा 'पार्ट ए' मध्ये धोरणात्मक घोषणा असतात आणि 'पार्ट बी' मध्ये केवळ कर प्रस्ताव आणि तांत्रिक बाबी असतात. मात्र, यंदा निर्मला सीतारमण यांनी हा पायंडा मोडला. त्यांनी 'पार्ट बी' ला केवळ कर प्रस्तावांपुरते मर्यादित न ठेवता, भारताच्या भविष्यातील आर्थिक रणनीतीचा मुख्य आधार बनवले. देशाच्या विकासाचा 'रोडमॅप' मांडण्यासाठी त्यांनी या भागाचा प्रभावी वापर केला, जे तज्ज्ञांच्या मते भारतीय अर्थसंकल्पातील एक मोठे स्थित्यंतर आहे.

नऊ अर्थसंकल्पांचा प्रवास : कधी लांब, तर कधी आटोपशीर
निर्मला सीतारमण यांच्या नावावर भारतीय संसदेतील सर्वात प्रदीर्घ भाषणाचा विक्रम आहे. त्यांच्या भाषणांचा प्रवास रंजक राहिला आहे.

  • २०२० चा ऐतिहासिक विक्रम : सीतारमण यांनी २ तास ४२ मिनिटे भाषण देऊन विक्रम प्रस्थापित केला होता. त्यावेळी त्यांची प्रकृती काहीशी खालावल्याने अखेरची दोन पाने लोकसभा अध्यक्षांना वाचावी लागली होती.
  • २०१९ चा प्रवास : त्यांच्या पहिल्याच पूर्णवेळ अर्थसंकल्पाचे भाषण २ तास १७ मिनिटे चालले होते.
  • २०२४ चा 'शॉर्ट' टच : २०२४ चा अंतरिम अर्थसंकल्प हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात लहान (५६ मिनिटे) ठरला होता.
  • आजची स्थिती (२०२६) : यंदाचे भाषण १ तास २५ मिनिटे चालले, जे गेल्या वर्षीच्या (१ तास १४ मिनिटे) भाषणापेक्षा थोडे लांब होते.

वाचा - 'हाय-टेक' अन् आत्मनिर्भर भारताचा मेगा प्लॅन! अर्थमंत्र्यांच्या २१ मोठ्या घोषणा, कोणत्या क्षेत्राला काय मिळालं?

सर्वात लहान आणि शब्दांनी मोठे भाषण

  • सर्वात कमी शब्दांचे भाषण : १९७७-७८ मध्ये मोरारजी देसाई सरकारमधील अर्थमंत्री हिरूभाई एम. पटेल यांनी केवळ ८०० शब्दांचे सर्वात लहान भाषण दिले होते.
  • शब्दांच्या बाबतीत सर्वात मोठे : १९९१ मध्ये मनमोहन सिंग यांनी दिलेले १८,६५० शब्दांचे भाषण आजही 'वर्ड काउंट'च्या बाबतीत अव्वल आहे.
  • अरुण जेटलींची नोंद : २०१८ मध्ये माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी १८,६०४ शब्दांचे दुसरे सर्वात मोठे भाषण दिले होते.
     

Web Title : निर्मला सीतारमण के बजट ने 75 साल की परंपरा तोड़ी, लगातार 9वीं बार पेश किया।

Web Summary : निर्मला सीतारमण ने अपना 9वां बजट पेश किया, ऐतिहासिक संरचना को बदला। 'पार्ट बी' भविष्य की आर्थिक रणनीति पर केंद्रित था, जिससे 75 साल की परंपरा टूट गई। उनका सबसे लंबा भाषण 2020 (2 घंटे, 42 मिनट) में और सबसे छोटा 2024 (56 मिनट) में था। इस वर्ष का भाषण 1 घंटा, 25 मिनट का था।

Web Title : Nirmala Sitharaman's budget breaks 75-year tradition with 9th consecutive presentation.

Web Summary : Nirmala Sitharaman presented her 9th budget, altering the historical structure. 'Part B' focused on future economic strategy, breaking a 75-year tradition. Her longest speech was in 2020 (2 hours, 42 minutes), the shortest in 2024 (56 minutes). This year's was 1 hour, 25 minutes.