Budget 2025 Income Tax Slab ( Marathi News ):केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सीतारमण यांनी टॅक्स बाबतीत एक मोठी घोषणा केली आहे. नवीन कर प्रणालीमध्ये १२ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर आयकर द्यावा लागणार नाही. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली होती. 'धनदेवता लक्ष्मी गरीब व मध्यमवर्गीयांना आशीर्वाद देईल, अशी मला आशा आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी म्हणाले होते. दरम्यान, कर प्रणालीमध्ये मध्यमवर्गीयांना मोठं गिफ्ट दिलं आहे.
१२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही आयकर लागणार नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घोषणेत सांगितले की, पुढील आठवड्यात नवीन आयकर विधेयक आणले जाईल. या प्रत्यक्ष कर सुधारणांबद्दल आम्ही तुम्हाला नंतर सांगू, असंही सीतारमण यांनी सांगितले.
पगारदार लोकांसाठी १२.७५ लाख रुपयांच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. नवीन कर स्लॅबची घोषणा करताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की, यामुळे मध्यमवर्ग आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल. आम्ही मध्यमवर्गीयांवरील कर कमी केले आहेत आणि मला हे सांगण्यास आनंद होत आहे की आता १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही.
बदलानंतर कर स्लॅब
० ते ४ लाखांपर्यंत - काहीही कर नाही४ लाख ते ८ लाखांपर्यंत - ५ टक्के८ लाख ते १२ लाख - १० टक्के१२ लाख ते १६ लाख - १५ टक्के१६ ते २० लाख - २० टक्के२० लाख ते २४ लाख - २५ टक्के२४ लाखांच्या वर - ३० टक्के
शेतकऱ्यांना दिलं मोठं गिफ्ट
किसान क्रेडिट कार्डसाठी आता लिमिट वाढवण्यात आली आहे, कार्डवरती आता ५ लाखांपर्यंतचे लिमिट वाढवण्यात आले आहे. सध्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या क्रेडिट कार्डची एकूण मर्यादा तीन लाख रुपये आहे. आता ही मर्यादा वाढवून पाच लाख रुपये करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसापासून किसान क्रेडिट कार्डचे लिमिट वाढवण्यात आले नव्हते. अनेक दिवसापासून याबाबत मागणी करण्यात आली होती. आता याबाबत केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये निर्णय घेण्यात आला आहे.