Join us

ग्रामीण भागात घरेच घरे! अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, आणखी दोन कोटी 'आवास'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 11:51 IST

Budget 2024 Live Updates: पीएम आवास योजनेतून तीन कोटी घरे बांधण्यात येणार होती. त्या लक्ष्याच्या सरकार अगदी जवळ आहे.

मोदी सरकारने सर्वांना पक्की घरे देण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. अनेकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून दीड ते अडीज लाखांचा निधी दिला जात होता. आता निधीत वाढ न करता या योजनेचा विस्तार मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी आजच्या अंतरिम बजेटमध्ये मोठी घोषणा करण्यात आली आहे. 

यानुसार प्रधान मंत्री आवास योजना ग्रामीण (Pradhan Mantri Awas Yojana - Gramin) मधून दोन कोटी घरे बांधली जाणार आहेत, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. गरीब, महिला आणि शेतकरी आमच्यासाठी प्राधान्य असणार आहेत. ७० टक्के महिलांना या योजनेचा लाभ झाल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. 

पीएम आवास योजनेतून तीन कोटी घरे बांधण्यात येणार होती. त्या लक्ष्याच्या सरकार अगदी जवळ आहे. आता पुढील 5 वर्षांत आणखी 2 कोटी घरे बांधली जातील. आमचे सरकार मध्यमवर्गातील पात्र घटकांना त्यांची स्वतःची घरे खरेदी किंवा बांधण्यासाठी मदत करण्यासाठी एक योजना सुरू करेल, असे सीतारामन यांनी सांगितले. 

टॅग्स :केंद्रीय अर्थसंकल्प 2019निर्मला सीतारामनअर्थसंकल्प 2024बजेट क्षेत्र विश्लेषण