Join us  

Budget 2019: गो-संवर्धनासाठी कामधेनू योजना; 750 कोटींची तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 1:37 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून आपल्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प शुक्रवारी लोकसभेत सादर करण्यात आला. यावेळी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी या अर्थसंकल्पात कामधेनू योजनेची घोषणा केली. 

ठळक मुद्देगो-संवर्धनासाठी कामधेनू योजनाराष्ट्रीय गोकुळ आयोगाची स्थापना करणारकामधेनू योजनेसाठी 750 कोटींची तरतूद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून आपल्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प शुक्रवारी लोकसभेत सादर करण्यात आला. यावेळी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी या अर्थसंकल्पात कामधेनू योजनेची घोषणा केली. 

गोरक्षण व संवर्धनासाठी आग्रही असलेल्या सत्ताधारी भाजपा सरकारने आपल्या अपेक्षेप्रमाणे यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पात कामधेनू योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत गो-संवर्धनासाठी सरकार राष्ट्रीय गोकुळ आयोगाची स्थापना करणार येणार आहे. यावेळी 'गो-संवर्धनासाठी आवश्यक असेल ते सर्वकाही केले जाईल,' असे अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी स्पष्ट केले. तसेच, कामधेनू योजनेसाठी 750 कोटींची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Budget 2019 Latest News & Live Updates

केंद्रीय अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे

  • असंघटित कामगारांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा, 21 हजार रुपये पगार असणाऱ्या असंघटित कामगारांना मासिक 3 हजार रुपये पेन्शन मिळणार, 10 कोटी कामगारांना याचा लाभ मिळणार 
  • 21 हजारपर्यंत पगार असलेल्या असंघटीत कामगारांना बोनस, कामगारांना 7 हजार रुपये बोनस देण्याची घोषणा.
  • पशू आणि मत्स्यपालनासाठी कर्जात 2 टक्क्यांची सवलत 
  • किसान सन्मान निधी योजनेसाठी 75 कोटी 
  • सरकार कामधेनू योजना सुरू करणार 
  • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार 
  • दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा होणार 
  • गरिबांना आम्ही आरक्षण दिलं, परंतु आरक्षण व्यवस्थेत कोणतीही छेडछाड केली नाही, आम्ही मनरेगासाठी आणखी निधी देऊ
  • यूपीए सरकारमुळे अर्थव्यवस्थेवरील बोजा वाढला
  • आज बँका कर्जवसुली करू शकत आहेत, जे लोक पैसे देत नव्हते, तेसुद्धा आता पैसे देत आहेत. बरेच जण कर्ज चुकवण्यासाठी पुढे सरसावले आहेत
  • एनपीए कमी करण्यावर आम्ही भर दिला, क्लीन बँकिंगच्या दिशेनं पाऊल टाकलं
टॅग्स :अर्थसंकल्प 2019गायपीयुष गोयलभाजपा