Join us

BSNL कडून दिवाळी ऑफरचा 'पाऊस'; 'या' रिचार्जवर ९० टक्के डिस्काऊंट, एकदाच संधी पुन्हा नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 20:15 IST

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने दिवाळीनिमित्त एक चांगली ऑफर आणली आहे. BSNL ने भारतातील नवीन भारत फायबर (FTTH) ब्रॉडबँड ...

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने दिवाळीनिमित्त एक चांगली ऑफर आणली आहे. BSNL ने भारतातील नवीन भारत फायबर (FTTH) ब्रॉडबँड ग्राहकांसाठी दिवाळी धमाका ऑफर 2021 जाहीर केली आहे. दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार कंपनीनं ग्राहकांसाठी एक विशेष सवलत योजना सुरू केली आहे, याअंतर्गत नवीन ग्राहकांना मासिक शुल्कार तब्बल 90 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. हा प्लॅन केवळ नवीन BSNL FTTH ग्राहकांसाठी लागू असेल ज्यांचे कनेक्शन ऑफर कालावधी दरम्यान अॅक्टिव्ह असेल.

BSNL आपला FTTH बिझनेस वाढवण्यासाठी आकर्षक ऑफर्स आणण्याचा निर्मय़ घेतला आहे. हा प्लॅन बीएसएनलच्या एफटीटीएच व्यवसायात नक्कीच वाढ आणू शकतो अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. जर तुम्हाला बीएसएनएलच्या या प्लॅनचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही एफटीटीएच कनेक्शन BookMyFiber Portal वर किंवा बीएसएनएल Customer Service Centers च्या माध्यमातून बुक करू शकता. ही विशेष डिस्काऊंट स्कीम १ नोव्हेंबरपासून पुढील ९० दिवसांसाठी उपलब्ध असेल.

काय आहेत अटी?केरळ टेलिकॉमच्या रिपोर्टनुसार BSNL २०२१ मध्ये सर्व नव्या भारत फायबर कनेक्शनसाठी मासिक शुल्कात ९० टक्क्यांची सूट देणार आहे. परंतु ग्राहक कोणत्याही योजनेत सर्वाधिक ५०० रूपयांची सूट मिळवू शकतात. ग्राहक जो प्लॅन घेतील त्यामध्ये पहिल्या महिन्याच्या बिलात त्यांना कमाल ५०० रूपयांची सूट दिली जाणार आहे.

बीएसएनएलचा एफटीटीएच प्लॅन अंदमान आणि निकोबार टेलिकॉम सर्कल सोडून देशात सर्वत्र उपलब्ध आहे. या अंतर्गत कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड वॉईस कॉलिंगचा लाभ दिला जातो. याशिवाय ३०० एमबीपीएसपर्यंत इंटरनेट स्पीडही उपलब्ध करून देण्यात येतो. ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय बंडल वॉईस कॉलिंगचा लाभ घेता येतो. 

टॅग्स :बीएसएनएलइंटरनेट