Join us  

पाहा BSNL, Airtel, Jio चे स्वस्त ब्रॉडबँड प्लॅन्स; ५०० रूपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतोय ३३०० जीबी डेटा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 6:26 PM

Cheap Broadband Plans : कंपन्या आपल्या ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी आणत आहेत निरनिराळे प्लॅन्स. वर्क फ्रॉम होममुळे वाढली हायस्पीड इंटरनेटची मागणी.

ठळक मुद्देकंपन्या आपल्या ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी आणत आहेत निरनिराळे प्लॅन्स.वर्क फ्रॉम होममुळे वाढली हायस्पीड इंटरनेटची मागणी.

सध्या अनेक जण इंटरनेटच्या माध्यमातूनच आपलं काम करत आहोत. कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर अनेकांचं वर्क फ्रॉम होम सुरू आहे. तर दुसरीकडे मुलांच्या शाळादेखील आता ऑनलाईन झाल्या आहेत. यामुळे सध्या हायस्पीड इंटरनेटची मागणी मोठ्या प्रमामात वाढली आहे. जाणून घेऊया कोणते आहेत ५०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे प्लॅन्स.

BSNL ₹449 Broadband Planबीएसएनएलच्या या प्लॅनसोहत ३० एमबीपीएसचा स्पीड मिळतो. तसंच कंपनी यासोबत ग्राहकांना ३३०० जीबी डेटा देते. फर्स्ट टाईम युझरसाठी कंपनीनं हा प्लॅन ऑफर केला आहे. यानंतर ग्राहकांना ५९९ रूपयांच्या फायबर बेसिक प्लॅनवर शिफ्ट केलं जाईल. या प्लॅनमध्ये ग्राहकांना ६० एमबीपीएसचा स्पीड आणि ३३०० जीबी डेटा देण्यात येतो. याशिवाय लिमिट संपल्यानंतर ग्राहकांना २ एमबीपीएसचा स्पीड मिळतो. यासोबत ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही मिळते. 

Reliance Jio Plans ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारा रिलायन्स जिओचा प्लॅन म्हणजे ३९९ रूपयांचा प्लॅन. JioFiber 399 Broadband Plan मध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि अनलिमिटेड इंटरनेटची सुविधा मिळते. या प्लॅनसोबत कंपनी ग्राहकांना ३३०० जीबीचा डेटा आणि ३० एमबीपीएसचा प्लॅन ऑफर करते. या प्लॅनसोबत ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगचाही लाभ मिळतो. 

Airtel XStream ₹449 Plan एअरटेलची ब्रॉडबँड सेवा Airtel XStream तुम्हाला ५०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे प्लॅन ऑफर करते. याची किंमत ४९९ रूपये इतकी आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना ४० एमबीपीएसचा स्पीड देण्यात येतो. तसंच अनलिमिटेड इंटरनेट आणि अनलिमिटेड कॉलिंगचीही सुविधा मिळते. यासोबत ग्राहकांना Airtel XStream, Wynk Music, Shaw academy, Voot Basic, Eros Now, Hungama Play, Shemaroo M आणि Ultra चा देखील अॅक्सेस मिळतो.

टॅग्स :इंटरनेटएअरटेलरिलायन्स जिओबीएसएनएल