Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीचे तिकीट आजच बुक करा, हवाई प्रवास भाड्यात होतेय वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 10:15 IST

केरळातील ओणमच्या काळातील तिकिटांच्या किमती २० ते २५ टक्के वाढल्याचे दिसत आहे. 

नवी दिल्ली : आगामी सणासुदीच्या हंगामासाठी हवाई प्रवास भाड्यात गतीने वाढ होत आहे. दिवाळीच्या काळातील तिकिटांच्या किमतीत १० ते १५ टक्के, तर केरळातील ओणमच्या काळातील तिकिटांच्या किमती २० ते २५ टक्के वाढल्याचे दिसत आहे. 

ट्रॅव्हल पोर्टल ‘इक्सिगो’च्या विश्लेषणानुसार, दिल्ली-चेन्नई या मार्गावरील इकॉनॉमी श्रेणीतील सरासरी एकमार्गी हवाई प्रवास भाडे २५ टक्के वाढून ७,६१८ रुपये झाले आहे. मुंबई-हैदराबाद मार्गावरील तिकिटाची किंमत २१ टक्के वाढून ५,१६२ रुपये झाली आहे.

दिल्ली-गोवा आणि दिल्ली-अहमदाबाद मार्गावरील भाडे १९ टक्के वाढून अनुक्रमे ५,९९९ रुपये आणि ४,९३० रुपये झाले आहे. इतर काही मार्गांवरील भाड्यात १ ते १६ टक्के वाढ झाली आहे.

टॅग्स :विमानव्यवसाय