Join us
Daily Top 2Weekly Top 5

काही मिनिटांत आयफोन १६ घरपोच देणारी ब्लिंकिट पुन्हा चर्चेत, कर्मचाऱ्यांसाठी काढला नवा फतवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 10:34 IST

Quick Commerce: झेप्टो, फ्लिपकार्ट मिनिट्स आणि स्विगी इंस्टामार्ट सारख्या क्विक कॉमर्स कंपन्या वेगाने विस्तारत आहेत. अशा परिस्थितीत ब्लिंकिटने आपले कर्मचारी वर्ग सुरक्षित ठेवण्यासाठी ही पावले उचलली आहेत.

Quick Commerce : काही मिनिटांत आयफोन १६ घरपोच करणारी ब्लिंकिट (Blinkit) कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. क्विक कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज ब्लिंकिटने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नवा फतवा काढला आहे. यामुळे आता कर्मचाऱ्यांना नोकरी सोडणे कठीण झाले आहे. झेप्टो, फ्लिपकार्ट मिनिट्स आणि स्विगी इंस्टामार्ट सारख्या प्रतिस्पर्धी कंपन्यांनी पात्र कर्मचाऱ्यांना ऑनबोर्ड करण्यासाठी केलेल्या मोहिमेमुळे ब्लिंकिट झिरो नोटीस पॉलिसी बंद केली आहे. अशा परिस्थितीत आता राजीनामा दिल्यानंतर लगेच नोकरी सोडता येणार नाही. कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्यापूर्वी २ महिन्यांपर्यंत नोटीस द्यावी लागणार आहे.

ब्लिंकिट कंपनीचा कर्मचाऱ्यांना धक्कामनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, ब्लिंकिटने कंपनीच्या रोजगार करारातही बदल केले आहेत. नवीन करारानुसार कर्मचाऱ्यांना ० ते २ महिन्यांची नोटीस बजावावी लागणार आहे. याशिवाय कंपनीने गार्डन लीव्ह पॉलिसीही लाँच केली आहे. या अंतर्गत, एखादा कर्मचारी प्रतिस्पर्धी कंपनीत जात असेल तर त्याला तात्काळ २ महिन्यांची सुट्टी दिली जाईल जेणेकरून कोणताही डेटा लीक होऊ नये.

कर्मचाऱ्यांवरुन कंपन्यांमध्ये स्पर्धादेशातील क्विक कॉमर्स बिजनेस ५.५ अब्ज डॉलर्सचा आहे. त्यातही झपाट्याने वाढ होत आहे. जुन्या खेळाडूंशिवाय अलीकडे फ्लिपकार्टसारख्या मोठ्या कंपन्यांनीही यात प्रवेश केला आहे. या सर्व कंपन्या या व्यवसायतील चांगल्या कर्मचाऱ्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ब्लिंकिटसारख्या जुन्या कंपन्या असुरक्षित झाल्या आहे. या दबावामुळे झिरो नोटीस धोरण रद्द करण्यात आले आहे. झेप्टो आणि फ्लिपकार्टसारख्या कंपन्या ब्लिंकिटच्या जुन्या कर्मचाऱ्यांना मोठ्या ऑफर्सचे आमिष दाखवून आकर्षित करू शकतात, असा दावा सूत्रांनी केला आहे.

Zepto ने मोठा निधी उभारला, Swiggy चा IPO येतोय, स्पर्धा वाढणारक्विक कॉमर्स क्षेत्रातील गुंतवणूक वाढल्याने हा धोका अधिक वाढला आहे. झेप्टोला अलीकडेच ३४० दशलक्ष डॉलर्सचा निधी मिळाला आहे. ही कंपनीही वेगाने विकसित होत आहे. फ्लिपकार्ट मिनिट्सने बेंगळुरू येथून आपलं काम सुरू केलंय. आता ही कंपनी इतर मोठ्या शहरांमध्येही आपले हातपाय पसरण्याच्या तयारीत आहे. स्विगीने अलीकडेच आपला मोठा IPO लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. या वर्षी कंपनी शेअर बाजारात उतरणार आहे. त्यामुळे इन्स्टामार्टचे हातही बळकट होणार आहेत.

टॅग्स :फ्लिपकार्टकर्मचारीअ‍ॅमेझॉन