Join us  

SBIच्या 'या' योजनेत 100 रुपयांपासून करा गुंतवणूक अन् मिळवा जबरदस्त फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2019 5:19 PM

सरकारी योजनांत गुंतवलेल्या पैशांची हमी तर मिळतेच, शिवाय त्यावर व्याजाच्या स्वरूपात जास्त फायदा पोहोचतो.

नवी दिल्लीः सरकारी योजनांत गुंतवलेल्या पैशांची हमी तर मिळतेच, शिवाय त्यावर व्याजाच्या स्वरूपात जास्त फायदा पोहोचतो. एसबीआय किंवा पोस्टातली आरडीसुद्धा अशाच प्रकारे छोट्या गुंतवणुकीवर जास्त नफा मिळवून देते. या खात्यामधल्या पैशावर मिळालेल्या व्याजाच्या 10 हजारांपर्यंतच्या रकमेवर कोणताही कर द्यावा लागत नाही. आरडीचा मॅच्युरिटी पीरियड हा पाच वर्षांचा असतो. तसेच भारतीय स्टेट बँके(SBI)च्या आरडी अकाऊंटवर 12 महिने कमीत कमी आणि 120 महिने जास्तीत जास्त मॅच्युरिटीचा पीरियड देण्यात आला आहे. कसं सुरू कराल रेकरिंग डिपॉझिट- आरडी खातं पोस्ट ऑफिस किंवा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जाऊन उघडता येतं, तसेच आपण हे खातं ऑनलाइनही उघडू शकतो. पोस्टात आरडी उघडण्यासाठी तुम्हाला रोख रक्कम किंवा धनादेश द्यावा लागतो. तुमचं खातं एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्येही ट्रान्सफर करता येते. तसेच दोन जणांच्या नावे संयुक्त खातंही उघडता येते. आरडी खातं उघडण्यापूर्वी पहिल्यांदा कुठे जास्त व्याज मिळत ते पाहावे. जर आपल्याला आरडीवर 10 हजारांहून अधिक व्याज मिळत असेल तर त्यावर आपल्याला कर द्यावा लागू शकतो. पोस्ट खात्यातील 1 ते 5 वर्ष आरडी योजनेत ग्राहकाला 7.3 टक्के व्याज देण्यात येत आहे. मात्र, आरडीवर 10 हजारपेक्षा अधिक वार्षिक व्याज मिळत असेल तर त्यासाठी ग्राहकांना टॅक्स द्यावा लागणार आहे. म्हणजेच, ग्राहकांना यावर कर बसेल. 

एसबीआय आरडीवर असा मिळतो लाभ?- एसबीआयच्या आरडी अकाऊंटमध्ये कमीत कमी 100 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. या खात्यात पैसे जमा करण्याची कोणतीही मर्यादा नाही. एसबीआयच्या आरडी खात्यावरील व्याजदर हे एफडीसारखेच असतात. आरडीमध्ये असलेल्या 2 कोटींच्या कमी रकमेवर व्याजदर लागू असतो. एसबीआयच्या आरडीवर 7.5 टक्क्यांपर्यंत जमा रकमेवर व्याज दिलं जातं. पोस्टाच्या आरडीवर असा होणार फायदा?-  पोस्ट ऑफिसच्या RDवर वर्षाला 7.3 टक्के व्याज मिळतं. हे चक्रवाढ व्याजासारखं असतं. दर तिमाहीत व्याजदरात बदल होत असतो. अशातच आपण आरडीमध्ये 3 हजार रुपये गुंतवल्यास 5 वर्षांनी 7.3 टक्के वार्षिक व्याजानुसार आपल्या खात्यात 2,17,515 रुपये जमा होणार आहे. म्हणजे 5 वर्षांत आपल्याला जवळपास 37,515 रुपये अतिरिक्त फायदा मिळणार आहे. 

टॅग्स :एसबीआयपोस्ट ऑफिससरकारी योजना