Join us

Video : अब्जाधीश उद्योगपतीवर का आली लोकलनं प्रवास करण्याची वेळ? तुम्हीच पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 12:51 IST

त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे.

सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा कोणी खास, मुंबईच्या ट्रॅफिकमुळे सर्वच जण त्रस्त आहेत. ही समस्या टाळण्यासाठी अब्जाधीश निरंजन हिरानंदानी मुंबईच्या लाईफलाइन लोकल ट्रेनमधून प्रवास करताना दिसले. हिरानंदानी समुहाचे ७३ वर्षीय सह-संस्थापक आणि एमडी निरंजन हिरानंदानी यांनी शुक्रवारी इंस्टाग्रामवर त्यांच्या रेल्वे प्रवासाचा व्हिडीओ शेअर केला. यामध्ये ते इतर प्रवाशांसोबत प्लॅटफॉर्मवर थांबताना आणि नंतर एसी कोचमध्ये चढताना दिसून आले.सांगितला अनुभववेळ वाचवण्यासाठी आणि मुंबईचा प्रसिद्ध ट्रॅफिक वाचवण्यासाठी ट्रेननं प्रवास केल्याचं निरंजन हिरानंदानी यांनी म्हटलं. एसी कोचमध्ये मुंबई ते उल्हासनगर प्रवास करणे हा एक अभ्यासपूर्ण वैयक्तिक अनुभव होता, असंही सांगितलं. शेअर केल्यानंतर लाखो लोकांनी हा आतापर्यंत हा व्हिडीओ पाहिला. अनेकांनी यावर कमेंट्सही केल्या. लोकल ट्रेननं प्रवास केल्याबद्दल काहींनी हिरानंदानी यांची प्रशंसाही केली. तर काही लोकांनी हे स्क्रिप्टेड असल्याचंही म्हटलं. {{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/1527907751342855/}}}}कोण आहेत निरंजन हिरानंदानी?निरंजन हिरानंदानी हे रिअल इस्टेटमधील मोठं नाव आहे. निरंजन हिरानंदानी यांनी त्यांचा बंधू सुरेंद्र यांच्यासोबत हिरानंदानी समुहाची स्थापना केली होती. सुरेंद्र हे आता वेगळे व्यवसाय चालवत असले तरी, संयुक्त रुपानं त्यांच्याकडे काही प्रॉपर्टीज आहेत. फोर्ब्सच्या मते, मुंबईतील पवई टाउनशिप ही त्यापैकी एक मालमत्ता आहे. २०१६ मध्ये, पवईमधील मालमत्तेचा एक भाग ब्रुकफील्ड अॅसेट मॅनेजमेंटनं १ बिलियन डॉलर्समध्ये खरेदी केला होता. निरंजन हिरानंदानी एनर्जी, इन्फ्रा, नॅचरल गॅस पाइपलाइन आणि गॅस स्टोरेज टर्मिनल्सच्या बांधकामात गुंतवणूक करत आहेत. फोर्ब्सनुसार, निरंजन हिरानंदानी यांची संपत्ती १.५ अब्ज डॉलर्स आहे आणि ते देशातील टॉप १०० अब्जाधीशांमध्ये सामील आहेत. निरंजन हिरानंदानी यांच्या पत्नीही त्यांच्या व्यवसायात मदत करतात. निरंजन हिरानंदानी यांना दोन मुलं आहेत. त्यांचा मुलगा दर्शन नवी मुंबई आणि नोएडा येथे डेटा सेंटर चालवतो.

टॅग्स :व्यवसायरेल्वे