शेअर बाजारातीलगौतम अदानी समूहाच्या सिमेंट व्यवसायातील महत्त्वपूर्ण कंपनी असलेल्या 'सांघी इंडस्ट्रीज'च्या शेअर्समध्ये मंगळवारी जबरदस्त तेजी दिसून आली. हा शअर सोमवारच्या ६२ रुपयांच्या क्लोजिंगवरून ३ टक्यांनी वधारून ६४.३३ रुपयांवर पोहोचला. आता, अंबुजा सिमेंटने आपल्या उपकंपन्यांसंदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतल्यानंतर, गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
उपकंपन्यांच्या विलीनीकरणाला मंजुरी -अदानी समूहाची प्रमुख कंपनी 'अंबुजा सिमेंट'च्या संचालक मंडळाने एसीसी लिमिटेड आणि ओरिएंट सिमेंट या आपल्या उपकंपन्यांच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे. या प्रक्रियेमुळे सांघी इंडस्ट्रीजसह इतर उपकंपन्या अंबुजा सिमेंटचा अविभाज्य भाग बनतील. या विलीनीकरणामुळे ब्रँडिंग, लॉजिस्टिक आणि विक्रीवरील खर्च कमी होऊन प्रति टन १०० रुपयांपर्यंत मार्जिन सुधारण्याची शक्यता आहे. कामकाजातील ही सुसूत्रता सांघी इंडस्ट्रीजच्या भविष्याच्या दृष्टीने महत्वाची आहे.
सप्टेंबर २०२५ च्या तिमाहीत सांघी इंडस्ट्रीजच्या विक्रीत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. कंपनीची निव्वळ विक्री मागील वर्षीच्या १५१.५० कोटी रुपयांवरून ८८ टक्क्यांनी वाढून २८४.९३ कोटी रुपयांवर पोहोचली. विशेष म्हणजे, कंपनीचा निव्वळ तोटाही मागील वर्षीच्या १९५.६८ कोटी रुपयांवरून कमी होऊन ११६.५५ कोटी रुपयांवर आला आहे. ही सुधारणा कंपनीच्या प्रगतीचे संकेत देते.
सांघी इंडस्ट्रीजमध्ये प्रवर्तकांकडे ७५ टक्के हिस्सा असून, त्यापैकी ५८.०८ टक्के (१५ कोटींहून अधिक शेअर्स) एकट्या अंबुजा सिमेंटकडे आहेत. तर पब्लिक शेअरहोल्डिंग 25 पर्सेंट एवढी आहे.
Web Summary : Sanghi Industries shares surged following Ambuja Cement's merger approval. The move aims to streamline operations, potentially boosting margins. September quarter sales jumped 88%, reducing net losses. Ambuja Cement holds a significant stake in Sanghi Industries.
Web Summary : अंबुजा सीमेंट के विलय की मंजूरी के बाद सांघी इंडस्ट्रीज के शेयरों में उछाल आया। इस कदम का उद्देश्य संचालन को सुव्यवस्थित करना है, जिससे संभावित रूप से मार्जिन में वृद्धि होगी। सितंबर तिमाही की बिक्री में 88% की वृद्धि हुई, जिससे शुद्ध घाटा कम हुआ। अंबुजा सीमेंट की सांघी इंडस्ट्रीज में महत्वपूर्ण हिस्सेदारी है।