Join us

NSDL च्या बहुप्रतीक्षीत IPO बद्दल मोठी अपडेट, ३००० कोटी उभारण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 11:55 IST

Upcoming NSDL IPO: डिपॉझिटरी फर्म एनएसडीएलच्या आयपीओची वाट पाहणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पाहा काय आहेत डिटेल्स.

Upcoming NSDL IPO: डिपॉझिटरी फर्म एनएसडीएलच्या आयपीओची वाट पाहणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कंपनी पुढील महिन्यापर्यंत आपला बहुप्रतीक्षित ३००० कोटी रुपयांचा आयपीओ आणण्याच्या विचारात असल्याची महिती समोर आलीये. एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं २० फेब्रुवारी रोजी यासंदर्भातील माहिती दिली.

अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्टिट्यूशनच्या रुपात (एमआयआय) नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडला (NSDL) रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या मसुद्याव्यतिरिक्त इतर मंजुरीची ही आवश्यकता आहे, असंही ते म्हणाले. इकॉनॉमिक टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलंय. डेडलाइनबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आमच्या तारखा पुढील महिन्यात संपत आहेत. कामं जलदगतीनं व्हावी यासाठी आपण काळाच्या विरुद्ध धावत आहोत. आम्ही (त्याआधी आयपीओ लाँच करण्याचा) प्रयत्न करू, असं त्यांनी नमूद केलं.

गेल्या सप्टेंबर महिन्यात एनएसडीएलला आयपीओसाठी सेबीकडून हिरवा झेंडा मिळाला होता. रिपोर्टनुसार एनएसई, स्टेट बँक आणि एचडीएफसी बँकेनं या आयपीओमध्ये ५.७२ कोटी शेअर्स विकण्याची योजना आखली आहे, जे ओएफएस असणार आहे. 

गेल्या आठवड्यात आलेल्या आकडेवारीनुसार एनएसडीएलचा निव्वळ नफा डिसेंबर तिमाहीत ३० टक्क्यांनी वाढून ८५.८ कोटी रुपये झालाय. ऑक्टोबर-डिसेंबर २०२४ या कालावधीत कंपनीचं एकूण उत्पन्न १६.२ टक्क्यांनी वाढून २९१.२१ कोटी रुपये झालंय.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेमं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार