Join us

UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 12:33 IST

यूपीआय वापरणाऱ्या लाखो युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. युपीआय ट्रान्झॅक्शनशी निगडित दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

यूपीआय वापरणाऱ्या लाखो युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. युपीआय ट्रान्झॅक्शनशी निगडित दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जर तुमचं ट्रान्झॅक्शन फेल झालं तर युजर्सना आता त्वरित रिफंड मिळणारे. त्यासाठी आता वाट पाहण्याची गरज नाही. नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) १५ जुलैपासून नवा नियम लागू करणार आहे. यानंतर जर खात्यातून पैसे कापले गेले पण पेमेंट झालं नाही तर युजरला तात्काळ रिफंड मिळेल. म्हणजेच त्याच्या खात्यात लगेचच पैसे परत येतील. इतकंच नाही तर चुकीच्या यूपीआय नंबरवर पैसे पाठवल्यास युजर आपल्या बँकेकडून पैसे परत मागू शकणार आहे. नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बँका आता एनपीसीआयच्या पूर्वपरवानगीशिवाय काही डिक्लाईन चार्जबॅक स्वत: मिळवू शकतील.

सध्या समस्या काय?

सध्याच्या प्रणालीनुसार, जर एखाद्या बँकेनं UPI चार्जबॅक विनंती अनेक वेळा नाकारली तर NPCI प्रणाली आपोआप पुढील प्रक्रिया थांबवते. यासाठी, बँकेला केस "व्हाइटलिस्ट" करण्यासाठी NPCI ला मॅन्युअली याचिका करावी लागते. ही प्रक्रिया संथ आणि गुंतागुंतीची होती, ज्यामुळे ग्राहकांना रिफंडसाठी बराच वेळ वाट पहावी लागत होती. आता, या नवीन चार्जबॅक प्रणालीमुळे, ही प्रक्रिया खूपच जलद आणि सोपी होईल.

IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा

यूपीआय पेमेंट खूप सोपं

एनपीसीआयनं यूपीआयच्या पेमेंट पद्धतीत बदल केला आहे. यापूर्वी हे पेमेंट ३० सेकंदात केलं जात होतं. आता १०-१५ सेकंदात पैसे दिले जातील. हा नवा नियम १६ जून २०२५ पासून लागू झाला आहे. गेल्या महिन्यात एनपीसीआयनं बँका आणि पेमेंट अॅप्सना त्यांची प्रणाली अपडेट करण्यास सांगितलं होतं, जेणेकरून केवळ १५ सेकंदात पेमेंट केलं जाईल. एनपीसीआयनं २६ एप्रिल २०२५ रोजी सांगितलं की ते कामगिरी सुधारण्यासाठी यूपीआय व्यवहारांचा रिस्पॉन्स टाईम कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

टॅग्स :बँकपैसा