Join us

पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ईपीएफओने दिली शेवटची संधी, यानंतर लाभ मिळणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 12:28 IST

पेन्शनधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. ईपीएफओने  उच्च पगारावर निवृत्ती वेतनासाठी नियोक्त्यांद्वारे वेतन तपशील ऑनलाइन सबमिट करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे.

पेन्शनधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. ईपीएफओने  उच्च पगारावर निवृत्ती वेतनासाठी नियोक्त्यांद्वारे वेतन तपशील ऑनलाइन सबमिट करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. पेन्शनधारक हे तपशील ३१ जानेवारी २०२५ पर्यंत सबमिट करू शकतात. EPFO ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ३१ जानेवारी २०२५ पर्यंत प्रलंबित पर्याय/संयुक्त पर्यायांच्या पडताळणीसाठी या प्रलंबित अर्जांवर प्रक्रिया आणि अपलोड केल्याची खात्री करण्यासाठी नियोक्त्यांना शेवटची संधी दिली जात आहे.

यासह EPFO ​​ने नियोक्त्यांना १५ जानेवारी २०२५ पर्यंत आवश्यक स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे, जेणेकरून उच्च निवृत्ती वेतनासाठीच्या अर्जांवर प्रक्रिया करता येईल.

जुन्या इलेक्ट्रिक अन् छोट्या कार खरेदी करणे महागणार; GST १२ टक्क्यांवरून १८ टक्के झाला

EPFO ने आतापर्यंत मिळालेल्या अर्जांपैकी सुमारे ४.६६ लाख प्रकरणांमध्ये अतिरिक्त माहिती किंवा स्पष्टीकरण मागितले आहे. शिवाय, ३.१ लाखांहून अधिक अर्ज अजूनही नियोक्त्यांकडे प्रलंबित आहेत.

२०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एका निर्णयात, १ सप्टेंबर २०१४ पर्यंत कर्मचारी पेन्शन योजनेच्या विद्यमान सदस्यांना त्यांच्या पगाराच्या सुमारे ८.३३ टक्के पेन्शन म्हणून योगदान देण्याची परवानगी दिली होती. या आदेशानंतर, २६ फेब्रुवारी २०२३ रोजी ऑनलाइन सुविधा सुरू करण्यात आली, याद्वारे सदस्य पर्याय किंवा संयुक्त पर्यायांच्या पडताळणीसाठी अर्ज करू शकतात.

सुरुवातीला अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३ मे २०२३ ठेवण्यात आली होती, यानंतर २६ जून २०२३ आणि नंतर ११ जुलै २०२३ पर्यंत वाढवण्यात आली. जुलै २०२३ पर्यंत सुमारे १७.४९ लाख अर्ज मिळाले आहेत.

नियोक्ते आणि त्यांच्या संघटनांच्या विनंतीवरून, EPFO ​​ने पगाराचा तपशील सादर करण्याची अंतिम मुदत अनेक वेळा वाढवली. यापूर्वी ही मुदत ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत होती, ती नंतर ३१ डिसेंबर २०२३ आणि नंतर ३१ मे २०२४ पर्यंत वाढवण्यात आली. मात्र, अर्ज प्रक्रिया अजूनही संथ आहे. हे पाहता, EPFO ​​ने आता पगाराचा तपशील सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जानेवारी २०२५ पर्यंत वाढवली आहे.

नियोक्त्यांसाठी ही शेवटची संधी असल्याचे ईपीएफओने स्पष्ट केले आहे. तसेच, त्यांनी सर्व नियोक्त्यांना आवश्यक तपशील आणि माहिती वेळेवर प्रदान करण्याची विनंती केली आहे जेणेकरून प्रलंबित प्रकरणे लवकर निकाली काढता येतील.

टॅग्स :भविष्य निर्वाह निधी