Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी: अनिल अंबानींचा राजीनामा, या दोन मोठ्या कंपन्यांचे संचालकपद सोडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 23:48 IST

Anil Ambani News: अनिल धीरुभाई अंबानी ग्रुप (ए़डीएजी) चे चेअरमन अनिल अंबानी यांनी शुक्रवारी रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इफ्रास्ट्रक्चरच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे.

मुंबई - अनिल धीरुभाई अंबानी ग्रुप (ए़डीएजी) चे चेअरमन अनिल अंबानी यांनी शुक्रवारी रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इफ्रास्ट्रक्चरच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. बाजार नियामक सेबीने दिलेल्या आदेशांनंतर त्यांना कुठल्याही सूचिबद्ध कंपनीशी संबंधित राहण्यास मनाई करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी हे पाऊल उचलले आहे.

रिलायन्स पॉवरने बीएसई फायलिंगमध्ये सांगितले की, अनिल अंबानी, गैर कार्यकारी संचालक, सेबी यांच्या अंतरिम आदेशाचे पालन करत रिलायन्स पॉवरच्या बोर्डामधून बाजूला झाले आहेत. तर रियायन्स इफ्रास्ट्रक्चरने सांगितले की, अनिल अंबानी यांनी सेबीच्या अंतरिम आदेशानचे पालन करत बोर्डातून राजीनामा दिला आहे.

तर एडीएजी समूहाच्या दोन्ही कंपन्यांनी सांगितले की, आर-पॉवर आणि आर-इन्फ्राच्या संचालक मंडळाने शुक्रवारी राहुल सरीन यांना पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी स्वतंत्र संचालकाच्या रूपात अतिरिक्त संचालक नियुक्त केले आहे. मात्र ही नियुक्ती सर्वसाधारण सभेमध्ये सदस्यांच्या मान्यतेच्या अधीन आहे.  

टॅग्स :अनिल अंबानीरिलायन्सव्यवसाय