Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिलायन्स विकणार बिग एफएम रेडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 05:04 IST

अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स समूहाने आपले बिग एफएम रेडिओ चॅनल विकण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स समूहाने आपले बिग एफएम रेडिओ चॅनल विकण्याचा निर्णय घेतला आहे. जागरण प्रकाशनाच्या म्युझिक ब्रॉडकास्ट कंपनीने हे चॅलन १,२०० कोटींना विकत घेण्याची तयारी दर्शविली आहे. कंपनीने अधिकृत निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. निवेदनात म्हटले आहे की, रिलायन्स कॅपिटल आणि रिलायन्स लँड या कंपन्या रिलायन्स ब्रॉडकास्ट नेटवर्कमधील आपली सर्व हिस्सेदारी म्युझिक ब्रॉडकास्ट कंपनीला विकणार आहे. रिलायन्स कॅपिटलचे सीएफओ अमित बापना यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बिगर-गाभा व्यवसायातील गुंतवणूक कमी करण्याचे धोरण कंपनीने स्वीकारले आहे. त्यानुसार ही विक्री केली जात आहे. या व्यवहारामुळे आमचे कर्ज १,२०० कोटी रुपयांनी कमी होईल.

टॅग्स :अनिल अंबानीरिलायन्सरिलायन्स कम्युनिकेशन