Join us

शेअर बाजारात मोठी घसरण; गुंतवणूकदारांचे ३७.५९ लाख कोटी रुपयांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 06:29 IST

आर्थिक वर्षाचा लेखाजोखा

नवी दिल्ली : संपलेले आर्थिक वर्ष हे शेअर बाजारासाठी खूपच त्रासदायक राहिले. या वर्षामध्ये शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक सुमारे २४ टक्क्यांनी कमी झाला. याचा परिणाम बाजाराच्या भांडवलमूल्यावर झाला असून, वर्षभरात गुंतवणूकदारांचे ३७.५९ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

कोरोना व्हायरसमुळे जागतिक मंदीची शक्यता, त्यामुळे अर्थव्यवस्थांना पोहोचणारे नुकसान, देशामधील कमकुवत आर्थिक स्थिती अशा विविध कारणांमुळे शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री होत असलेली दिसून आली. या वर्षामध्येच बाजाराने मोठ्या घसरणीही अनुभवल्या. परिणामी बाजारातील नोंदणीकृत आस्थापनांचे बाजार भांडवलमूल्य कमी झाले.

आर्थिक वर्षामध्ये हे मूल्य ३७,५९,९५४.४२ कोटी रुपयांनी कमी होऊन १,१३,४८,७५६.५९ कोटी रुपयांवर आले आहे. आधीच्या वर्षामध्ये नोंदणीकृत आस्थापनांच्या बाजार भांडवलमूल्यामध्ये ८,८३,७१४.०१ कोटी रुपयांची वाढ झाली होती.

च्आर्थिक वर्ष २०१९-२० हे शेअर बाजारासाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे. या वर्षामध्ये मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने ४२ हजार अंशांचा टप्पा पार केला. अधिक व्यापक पायावर आधारित असलेला नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा प्रमुख निर्देशांक निफ्टीही १२ हजार अंशांचा टप्पा ओलांडून पुढे गेला. त्यानंतर मात्र काही काळाने बाजाराने तीव्र घसरण अनुभवली आणि संवेदनशील निर्देशांक २५,६३८.९० असा घसरलेलाही बघावयास मिळाला.

रिलायन्सचे बाजार भांडवल १० लाख कोटी

च्भारतामधील एक प्रमुख कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे नोव्हेंबर महिन्यामध्ये बाजार भांडवलमूल्य १० लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडून पुढे गेले. हा टप्पा पार करणारी ही पहिली भारतीय कंपनी आहे. सध्याही बाजार भांडवलमूल्याच्या आधारावर रिलायन्स इंडस्ट्रीज ही पहिल्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ टीसीएसचा क्रमांक लागतो.सला ३७.६ लाख कोटींचा फटका

टॅग्स :शेअर बाजार