Join us
Daily Top 2Weekly Top 5

RBI ची मोठी कारवाई, महाराष्ट्र गोव्यासह अन्य राज्यातील ८ सहकारी बँकांना ठोठावला दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 16:16 IST

गेल्या काही दिवसांपासून Reserve Bank नं कठोर पावलं उचलत अनेक सहकारी बँकांवर कारवाई केली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आठ सहकारी बँकांना अनेक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावला आहे. गुजरातच्या मेहसाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला 40 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मेहसाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (सहकारी बँका - ठेवींवर व्याजदर) निर्देशांच्या काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक कर्ज देण्याच्या नियमांशी संबंधित काही तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल 7 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचवेळी, महाराष्ट्रातील वरुड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, मध्य प्रदेशची जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक मर्यादित, छिंदवाडा आणि महाराष्ट्राची यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक यांना त्यांच्या KYC नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे.

याशिवाय, काही KYC तरतुदींचे पालन न केल्याबद्दल छत्तीसगड राज्य सहकारी बँक मरियडित, रायपूरला 25 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय गुना येथील सहकारी बँक आणि पणजीतील गोवा राज्य सहकारी बँकेलाही दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेनं नियमांच्या उल्लंघनाबाबत ही कारवाई केली असून याचा ग्राहकांवर मात्र कोणताही परिणाम होणार नाही.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकमहाराष्ट्रगोवा