Join us

बेलराइज इंडस्ट्रीजचा आयपीओ उद्या होणार खुला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 13:25 IST

आयपीओ पूर्णत: नवीन समभागांचा असून त्यात कोणताही विक्रीसाठीचा प्रस्ताव नाही. यातून २,१५० कोटी रुपये उभारले जाणार आहेत. यातील १,६१८ कोटी रुपये निवडक कर्जाची परतफेडीसाठी वापरण्यात येणार असून, उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरली जाणार आहे.

मुंबई : देशातील एक अग्रगण्य ऑटोमोटिव्ह पार्ट्स निर्माती कंपनी बेलराइज इंडस्ट्रीज लिमिटेड बुधवार, २१ मे २०२५ रोजी अत्यंत प्रतीक्षेत असलेली प्राथमिक सार्वजनिक समभाग विक्री (आयपीओ) सुरू करीत आहे. कंपनीने आपल्या सार्वजनिक प्रस्तावासाठी प्रतिशेअर ८५ ते ९० ही किंमत (दर्शनी मूल्य ५ रुपये प्रति शेअर) जाहीर केली आहे. आयपीओ शुक्रवार, २३ मे २०२५ रोजी बंद होणार आहे. गुंतवणूकदारांना किमान १६६ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्याच्या पटीत बोली लावता येणार आहे.

आयपीओ पूर्णत: नवीन समभागांचा असून त्यात कोणताही विक्रीसाठीचा प्रस्ताव नाही. यातून २,१५० कोटी रुपये उभारले जाणार आहेत. यातील १,६१८ कोटी रुपये निवडक कर्जाची परतफेडीसाठी वापरण्यात येणार असून, उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरली जाणार आहे.

कंपनीचे बजाज ऑटो, होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया, हीरो मोटोकॉर्प, जग्वार लँड रोव्हर आणि रॉयल एनफिल्ड यासारख्या कंपन्यांशी दीर्घकालीन संबंध आहेत. ऑस्ट्रिया, स्लोव्हाकिया, इंग्लंड, जपान आणि थायलंड या प्रमुख आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये कंपनीची उपस्थिती आहे.

१ हजारपेक्षा अधिक उत्पादनांची निर्मितीबेलराइज इंडस्ट्रीज विविध प्रकारच्या सुरक्षितता-आधारित प्रणाली आणि अभियांत्रिकी उपकरणांची निर्मिती करते. यांचा वापर बाइक, रिक्षा, कार, व्यापारी वाहने आणि कृषी वाहने यामध्ये केला जातो. 

कंपनीच्या १००० हजारांपेक्षा अधिक उत्पादनांमध्ये मेटल चेसिस, पॉलिमर घटक, सस्पेन्शन, बॉडी-इन-व्हाइट कंपोनन्ट, बॅटरी कंटेनर, स्टिअरिंग पार्ट आणि एक्झॉस्ट सिस्टम आदींचा समावेश आहे. 

ही उत्पादने इलेक्ट्रिक वाहने आणि इंधनावर चालणारी वाहने या दोन्हींसाठी सुसंगत आहेत. 

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक