मुंबई- बँकांशी संबंधित कोणतेही व्यवहार असल्यास ते 25 सप्टेंबरपूर्वीच करून घ्या, कारण 26 ते 29 पर्यंत बँका बंद राहणार आहेत. विविध राष्ट्रीयीकृत बँकांच्या विलिनीकरणाच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध राष्ट्रीयीकृत बँकांचे अधिकारी 26 आणि 27 सप्टेंबरला संपावर जाणार आहेत. त्यामुळे बँकिंग व्यवहार ठप्प होणार आहे. तसेच 28 सप्टेंबर रोजी चौथा शनिवार आहे, 29 सप्टेंबरला रविवार असल्यानं त्यादिवशीही बँकांचं कामकाज ठप्पच राहणार आहे. 30 सप्टेंबर रोजी अर्धवार्षिक कामांच्या पूर्ततेसाठी कोणतेही व्यवहार होणार नसून 1 ऑक्टोबरला आता बँकांची कामं करावी लागणार आहेत. बँकेचे अधिकारी विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या विलिनीकरणाच्या निर्णयाच्या विरोधात आहेत. हा निर्णय मागे घेण्यासह अधिकाऱ्यांच्या पगाराचे पुनरीक्षण, मोठ्या कर्जदारांना कर्जमाफी देण्याऐवजी एनपीए खात्याची वसुली करून त्याचा फायदा छोट्या कर्जदारांना देणे, अतिरिक्त शुल्क वसुली बंद करावी आणि बँकांचे व्यवहार आठवड्यातून पाच दिवस करण्याची एआयबीओसीची मागणी आहे. या मागण्यांसाठी एआयबीओसीच्या बॅनरखाली नागपूर चॅप्टरशी जुळलेले विविध राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी 26 आणि 27 सप्टेंबरला संपावर जाणार आहेत. त्यांच्याकडे बँकांचे अधिकार असल्यामुळे या दिवसात व्यवहार होणार नाहीत.
- संघटनांच्या मागण्या
बँकांचे विलीनीकरण करू नयेपाच दिवसाचा आठवडा करण्यात यावारोख व्यवहारांसाठीची वेळ कमी करावीवेतन आणि पगारात बदल करावेग्राहकांसाठीच्या सेवाशुल्कात कपात करावीआरबीआयच्या नियमानुसार निवृत्तीवेतन द्यावेएनपीएस रद्द करावाबँकांमध्ये नोकरभरती करावी
- सलग पाच दिवस बँका राहणार बंद26 आणि 27 सप्टेंबरः विलीनीकरणाविरोधात संप28 सप्टेंबर - चौथा शनिवार29 सप्टेंबर- रविवार 30 सप्टेंबर- अर्धवार्षिक हिशेब