Join us

Punjab National Bank : पंजाब नॅशनल बँक देतेय मोफत 2 लाख रुपयांचे बेनिफिट अन् अनेक ऑफर्स, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 14:36 IST

Punjab National Bank : पंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंत मोफत विमा देत आहे. मात्र, बँक जन धन खाते (Jan Dhan Accounts) असलेल्या ग्राहकांनाच ही सुविधा देत आहे.

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेच्या  (Punjab National Bank) ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक तुम्हाला अनेक सुविधा देत आहे. पंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंत मोफत विमा देत आहे. मात्र, बँक जन धन खाते (Jan Dhan Accounts) असलेल्या ग्राहकांनाच ही सुविधा देत आहे. याशिवाय, बँकेच्या इतर अनेक सुविधांचा लाभ ग्राहक घेऊ शकतात. 

मोफत 2 लाखांचा फायदापीएनबी रुपे जनधन कार्डची (PNB Rupay Jandhan Card) सुविधा बँकेकडून जन धन ग्राहकांना दिली जात आहे. या कार्डवर बँक ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या अपघाती विमा संरक्षणाची सुविधा देत आहे. रुपे कार्डद्वारे (Rupay Card) ग्राहक आपल्या खात्यातून पैसे काढू शकतात आणि खरेदी देखील करू शकतात.

330 रुपयांचा वार्षिक हप्त्यावर 2 लाखांचा लाभप्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी (PMJJBY) वार्षिक प्रीमियम 330 रुपये आहे. या योजनेअंतर्गत ग्राहकांना लाइफ कव्हर मिळते. या अंतर्गत डेथ बेनिफिट देखील मिळते. ही रक्कम तुमच्या बँक खात्यातून ईसीएसद्वारे (ECS) घेतली जाते.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनाप्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana,PMSBY) अत्यंत कमी प्रीमियमवर जीवन विमा देते. दरम्यान, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही केंद्र सरकारची एक अशी योजना आहे, ज्या अंतर्गत खातेदाराला फक्त 12 रुपयांमध्ये 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते.

टॅग्स :पंजाब नॅशनल बँकपैसा