Bangladesh India Zero Tariff On Textile: बांगलादेश आपल्या नव्या ट्रेड टॅरिफच्या यशाचा आनंद साजरा करत असतानाच भारतानं त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं आहे. वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी जाहीर केलंय की, भारत-अमेरिका व्यापार करारांतर्गत भारतीय कापड निर्यातदारांनाही बांगलादेशप्रमाणे 'झिरो टॅरिफ'चा लाभ मिळणार आहे.
यापूर्वी अमेरिकेने बांगलादेशसोबत केलेल्या करारात त्यांच्या कापड निर्यातीवर शून्य शुल्क आकारण्याची सवलत दिली होती. तेव्हापासून भारतीय कापड निर्यातदारही अमेरिकेकडून अशाच प्रकारच्या विशेष वागणुकीची मागणी करत होते. आता वाणिज्य मंत्र्यांच्या या विधानामुळे भारतीय निर्यातदारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, तर दुसरीकडे बांगलादेश या शर्यतीत पिछाडीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा जोरदार तेजी; Silver ₹६५०० नं वाढली, पाहा आजचे लेटेस्ट दर
कापड निर्यातीतील जागतिक स्पर्धा आणि भारताची स्थिती
अमेरिकेला कापड निर्यात करणाऱ्या देशांमध्ये भारत, बांगलादेश आणि पाकिस्तान हे आघाडीवर आहेत. पाकिस्तान आधीच मोठ्या शुल्काचा सामना करत असल्याने त्यांच्या कापड उद्योगाला अमेरिकेत तीव्र स्पर्धेला सामोरं जावं लागत आहे. अमेरिकेनं भारतावरील शुल्क कमी केल्यापासून पाकिस्तानचा कापड उद्योग संकटात सापडला आहे. मात्र, बांगलादेशसोबत शून्य शुल्काचा करार करून अमेरिकेनं भारतासमोर मोठं आव्हान उभं केलं होतं. भारतीय उत्पादनांना अमेरिकेत १८ टक्के शुल्काचा सामना करावा लागला असता, तर बांगलादेश भारताच्या पुढे निघून गेला असता. आता भारतालाही ही सवलत मिळणार असल्यानं बांगलादेशसाठी ही स्पर्धा अधिक कठीण होणारे.
बांगलादेशसोबतची मोठी स्पर्धा संपुष्टात
अमेरिका-भारत व्यापारी करारामुळे भारतीय कापड निर्यातदारांची मोठी चिंता दूर झाली आहे. वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी स्पष्ट केलं की, या करारात अशा तरतुदी आहेत ज्यामुळे भारतीय कापड निर्यातीवरील शुल्क शून्य केलं जाईल. यामुळे भारतीय निर्यातदारांना बांगलादेशशी स्पर्धा करताना समान संधी मिळेल आणि १८ टक्के शुल्काचा अतिरिक्त बोजा त्यांच्यावर पडणार नाही. बांगलादेश हा चीननंतर कापड उत्पादनांचा जगातील दुसरा सर्वात मोठा निर्यातदार आहे, म्हणूनच भारतासाठी हे शून्य शुल्काचं पाऊल धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं मानलं जातंय.
भारत-अमेरिका व्यापार करारातील शून्य शुल्काची तरतूद भारतीय कापड आणि वस्त्रोद्योगासाठी मोठं वरदान ठरू शकतं, कारण भारताची स्पिनिंग कपॅसिटी बांगलादेशच्या तुलनेत खूप जास्त आहे. भारत अमेरिकन कापसाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतो आणि या तरतुदीमुळे भारताला मोठा कोटा मिळू शकतो. भारतीय स्पिनिंग उद्योग हा जगातील सर्वात मोठ्या उद्योगांपैकी एक असून बांगलादेश स्वतः भारतीय धाग्याचा प्रमुख आयातदार आहे. या तांत्रिक सक्षमतेमुळे अमेरिकन बाजारपेठेत भारताचं स्थान अधिक बळकट होणार आहे.
Web Summary : India secures 'zero tariff' from the US, leveling the playing field with Bangladesh in textile exports. This move boosts Indian competitiveness and potentially impacts Bangladesh's market share in the US.
Web Summary : भारत ने अमेरिका से 'शून्य टैरिफ' प्राप्त किया, जिससे कपड़ा निर्यात में बांग्लादेश के साथ प्रतिस्पर्धा बराबर हो गई। इस कदम से भारतीय प्रतिस्पर्धात्मकता को बढ़ावा मिलेगा और संभावित रूप से अमेरिका में बांग्लादेश के बाजार हिस्सेदारी पर असर पड़ेगा।