Join us  

बजाज समूहाची मोठी झेप; अंबानी, अदानी अन् टाटाच्या पंक्तीत मिळाले स्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2023 2:46 PM

बाजारात आलेल्या तेजीमुळे बजाज ऑटोला मोठा फायदा झाला आहे.

Share Market: अलीकडेच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले, त्यापैकी तीन राज्यांमध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळाले आहे. त्याचा परिणाम बाजारावरही दिसून येतोय. निकालाच्या दिवसापासून बाजार तेजीत आहे. बाजारातील या तेजीचा फायदा अनेक कंपन्यांना झालाय. Bajaj समूहालाही याचा मोठा फायदा झाला असून, समूहाचे मार्केट कॅप $10 ट्रिलियनच्या पुढे गेले आहे. या वाढीसह भारतातील पाचवा सर्वात मोठा समूह बनला आहे. बजाजच्या पुढे टाटा, रिलायन्स, एचडीएफसी आणि अदानी ग्रुप आहे. त्यांचे मार्केट कॅप अनुक्रमे 31.01, 18.25, 14.29 आणि 11.95 ट्रिलियन डॉलर आहे.

बजाज समूहात किती कंपन्या आहेत?आपण बजाज समूहाच्या मार्केट लिस्टेड कंपन्यांबद्दल बोललो तर त्यांची संख्या 5 आहे. समूहाची सर्वात मौल्यवान कंपनी बजाज फायनान्स आहे, जी 2 टक्क्यांनी वाढली आहे. दुसरी सर्वात मोठी कंपनी बजाज फिनसर्व्ह 0.6 टक्क्यांनी आणि बजाज ऑटोमध्ये 2.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. समूहाची होल्डिंग कंपनी बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट्स जवळपास 7 टक्क्यांनी वाढली आहे. हा आकडा आज सकाळी बाजार उघडण्याच्या वेळेपर्यंतचा आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 5 वर्षांपूर्वी बजाज फिनसर्व्ह कंपनीत पैसे गुंतवले होते त्यांना 45 टक्के परतावा मिळाला आहे.

बजाज फायनान्सचीही तीच स्थिती आहे. कंपनीच्या शेअर्सनी 5 वर्षात 196% परतावा दिला आहे. बजाज ऑटोने गेल्या 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 120% परतावा दिला आहे. बजाज होल्डिंग्सने आपल्या गुंतवणूकदारांना 158% नफा मिळवून दिला आहे. गेल्या पाच वर्षांतील परताव्याबद्दल बोलायचे तर बजाज फायनान्सने सर्वाधिक कमाई केली आहे. कंपनीच्या वेगवान वाढीमध्ये या कंपनीचाही मोठा वाटा आहे. 

टॅग्स :बजाज ऑटोमोबाइलव्यवसायशेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूकअदानीमुकेश अंबानीटाटा