Join us

बाबा रामदेव यांच्या Patanjali Foods ला मोठा झटका, पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा ६४ टक्क्यांनी घसरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 13:05 IST

पतंजली फूड्स लिमिटेडचा आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 64 टक्क्यांनी कमी झाला.

बाबा रामदेव यांच्या कंपनी पतंजली फूड्स लिमिटेडचा आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 64 टक्क्यांनी कमी होऊन 87.75 कोटी रुपयांवर आला आहे. शुक्रवारी कंपनीनं ही माहिती दिली. खाद्यतेलाच्या किमती घसरल्यानं नफ्यात घट झाल्याचं कंपनीनं सांगितलं.

कंपनीनं मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 241.25 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. कंपनीने शेअर बाजाराला सांगितलं की, जून तिमाहीत त्यांचं एकूण उत्पन्न वाढून 7,810.50 कोटी रुपये झालं आहे. जे मागील आर्थिक वर्षातील याच तिमाहीत 7,370.07 कोटी रुपये होतं. खाद्यतेल सेगमेंटमध्ये कंपनीची विक्री 5,890.73 कोटी रुपये आहे.

उच्च किंमतीची इन्व्हेंटरी असली तरी किंमती कमी करण्याच्या सरकारच्या हस्तक्षेपामुळे तिमाहीदरम्यान नफ्यावर नकारात्मक प्रभाव पडल्याचं पतंजली फूड्सनं म्हटलं. 1986 मध्ये स्थापन झालेली ही कंपनी (पूर्वीची रुची सोया इंडस्ट्रीज) खाद्य तेलातील अग्रगण्य कंपन्यांपैकी एक आहे. एफएमजीसी आणि एफएमएचजीमध्ये प्रमुख कंपन्या बनण्याचं त्यांचं ध्येय आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

टॅग्स :पतंजलीरामदेव बाबा