Join us

पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 15:42 IST

येत्या वर्षी भारतात कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरासरी ९ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जाणून घ्या कोणाला मिळणार सर्वाधिक वाढ.

मुंबई : येत्या वर्षी भारतात कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरासरी ९ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ही वाढ यंदाच्या ८.९ टक्क्यांच्या सरासरीपेक्षा किंचित अधिक असेल, असे ‘एऑन’ या जागतिक व्यावसायिक सेवा संस्थेच्या ताज्या सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे.

  • रिअल इस्टेट/ पायाभूत क्षेत्र १०.९%
  • गैर-बँकिंग वित्तीय संस्था १०.०%
  • अभियांत्रिकी डिझाइन सेवा ९.७%
  • वाहननिर्मिती उद्योग ९.६%
  • किरकोळ व्यापार ९.६%
  • जीवनविज्ञान/औषधनिर्मिती ९.६%

पगार नेमका का वाढणार?

जागतिक अनिश्चितता असूनही वेतनवाढीचा सकारात्मक कल कायम राहणार आहे. यामागे मजबूत घरगुती खप, वाढते गुंतवणुकीचे प्रमाण, सरकारी धोरणांचे पाठबळ हे घटक आहेत.

कंपन्यांसाठी दीर्घकालीन फायदा

  • हा कल पाहता कंपन्यांना भविष्यातील व्यावसायिक गरजांसाठी मजबूत ‘टॅलेंट पाइपलाइन’ तयार करण्याची संधी मिळेल.
  • या घसरणीमुळे कामगार बाजार अधिक स्थिर होत असल्याचे संकेत मिळतात. कंपन्यांना कौशल्य सुधारणा करण्याची संधी आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : India Likely to See 10% Salary Hike Next Year: Report

Web Summary : Indian employees can expect a salary hike of around 9% next year, slightly higher than this year's 8.9%. Real estate, finance, and engineering sectors will benefit most due to domestic consumption and investment growth.
टॅग्स :पैसा