Join us

Auto Budget 2023: कार, बाईक, स्कूटर होणार स्वस्त! Nirmala Sitharaman यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 14:30 IST

अर्थमंत्री निर्मला सीतारमण आपल्या भाषणात म्हणाल्या, "कापड आणि शेती व्यतिरिक्त इतर वस्तूंवरील मूलभूत सीमाशुल्काची संख्याही 21 वरून 13 पर्यंत कमी करण्याचा माझा प्रस्ताव आहे. यामुळे आता खेळणी, सायकल, ऑटोमोबाईलसह काही वस्तूंवरील मुलभूत सीमा शुल्क, उपकर आणि अधिभारात काही प्रमानात बदल होईल."

गेल्या काही दिवसांत विविध कारणांमुळे वाहनांच्या किंमती वाढल्या आहेत. याच वर्षाच्या सुरुवातीला साधारणपणे सर्वच वाहन निर्माता कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. या शिवाय गेल्या वर्षातही वाहन निर्माता कंपन्यांनी अनेक वेळा आपल्या वाहनांच्या किंमती वाढवल्या आहेत. मात्र, आता वाहनांच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. कारण 2023 साठी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ऑटोमोबाईल सामानांवरील मुलभूत सीमाशुल्क दर कमी करण्याची घोषणा केली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण आपल्या भाषणात म्हणाल्या, "कापड आणि शेती व्यतिरिक्त इतर वस्तूंवरील मूलभूत सीमाशुल्काची संख्याही 21 वरून 13 पर्यंत कमी करण्याचा माझा प्रस्ताव आहे. यामुळे आता खेळणी, सायकल, ऑटोमोबाईलसह काही वस्तूंवरील मुलभूत सीमा शुल्क, उपकर आणि अधिभारात काही प्रमानात बदल होईल."

जुनी सरकारी वाहने स्क्रॅप होणार -अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या भाषणात, "प्रदूषण पसरवणारी जुनी वाहने बदलणे, हा आपली अर्थव्यवस्था ग्रीन (Green Economy) बनविण्याच्या दृष्टीने एक महत्वाचा भाग आहे. 2021-22 च्या अर्थसंकल्पात नमूद केलेले वाहन स्क्रॅपिंग धोरण पुढे नेण्याच्या दृष्टीने, मी केंद्र सरकारची जुनी वाहने स्क्रॅप करण्यासाठी पुरेशा निधीची तरतूद केली आहे. याच बरोबर जुनी वाहने आणि अॅम्ब्युलन्स बदलण्यासाठीही राज्यांना मदत केली जाईल, असेही सीतारमण यांनी म्हटले आहे." 

टॅग्स :अर्थसंकल्प 2023निर्मला सीतारामनअर्थसंकल्पीय अधिवेशन