Join us

ॲटलस सायकल्सच्या माजी अध्यक्षांची गोळी झाडून आत्महत्या; 2020 मध्ये वहिनीनेही जीवन संपविलेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 19:20 IST

दिल्लीच्या एपीजे अब्दुल कलाम मार्गावर कपूर यांचे घर आहे. या घरातच त्यांनी दुपारच्या सुमारास गोळी मारून आत्महत्या केली.

प्रसिद्ध सायकल कंपनी ॲटलसचे माजी अध्यक्ष सलिल कपूर यांनी स्वत:ला गोळी मारली आहे. घटनास्थळावर चिठ्ठी मिळाली असून उद्योग जगतात खळबळ उडाली आहे. 

दिल्लीच्या एपीजे अब्दुल कलाम मार्गावर कपूर यांचे घर आहे. या घरातच त्यांनी दुपारच्या सुमारास गोळी मारून आत्महत्या केली. दुपारी २.३० च्या सुमारास पोलीस त्यांच्या घरी पोहोचले होते. ते तीन मजली घराच्या तळमजल्यावर मृतावस्थेत आढळले. तातडीने त्यांना एम्समध्ये नेण्यात आले. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

कपूर यांनी काही लोकांनी आपला छळ केल्याचा आरोप केला आहे. चार लोकांचे नाव चिठ्ठीत लिहिण्यात आले आहे. हे लोक शारीरिक, मानसिक आणि टेलिफोनिक छळ करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

कपूर हे ९ कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणात आरोपी होते. 2015 मध्ये दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना अटक केली होती. डिफेन्स कॉलनी पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे कपूर यांची वहिनी नताशा कपूर हिनेही २०२० मध्ये आत्महत्या केली होती. तिचे पती संजय कपूर ॲटलस सायकल्सचे संयुक्त अध्यक्ष होते.

टॅग्स :गुन्हेगारी