Join us  

Atal Pension Yojana: मस्तच! अटल पेन्शन योजनेतून पती-पत्नी मिळवू शकतात दरमहा १० हजार, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 5:21 PM

Atal Pension Yojana: निवृत्तीनंतर आपली आर्थिक गरज कशी पूर्ण होणार? असा प्रश्न जर तुमच्यासमोर उपस्थित झाला असेल तर केंद्र सरकारची एक खास योजना आहे.

Atal Pension Yojana: निवृत्तीनंतर आपली आर्थिक गरज कशी पूर्ण होणार? असा प्रश्न जर तुमच्यासमोर उपस्थित झाला असेल तर केंद्र सरकारची एक खास योजना आहे. अटल पेन्शन योजनेचा लाभ घेणाऱ्या पती-पत्नींना पेन्शन स्वरुपात दरमहा १० हजार रुपये मिळू शकतात. यातून तुमच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक गरजेचा प्रश्न सुटू शकतो. 

पती-पत्नी अशा दोघांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त अटल पेन्शन योजनेत रजिस्ट्रेशन करावं लागेल. यात पत्नी आणि पत्नी दोघांना यात ५ हजार रुपये गुंतवावे लागतील. त्यानंतर दोघांनाही निवृत्तीनंतरच्या काळात दरमहा १० हजार रुपयांपर्यंतची पेन्शन मिळवता येणार आहे. पण या योजनेचा लाभ घेणाऱ्या पती-पत्नीचं वय १८ ते ४० वर्षांपर्यंत असणं गरजेचं आहे. या वगोगटातील दाम्पत्यालाच योजनेत रजिस्ट्रेशन करता येणार आहे. यासोबत दोघांचंही बँकेत बचत खातं असणार अनिवार्य आहे. 

योजनेचे फायदे कोणते?>> अटल पेन्शन योजनेअंतर्गत असंघटीत क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळतो. >> अटल पेन्सन योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्याला दरमहा कमीत कमी १ हजार ते ५ हजार रुपये पेन्शन स्वरूपात मिळतात.>> १८ ते ४० वयोगटातील कोणताही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो. त्याचं बँकेत बचत खातं असणं गरजेचं आहे.>> अटल पेन्शन योजनेतील लाभार्थ्याच्या गुंतवणूकीपैकी ५० टक्के किंवा प्रतिवर्षी १ हजार रुपये यातील जी रक्कम कमी असेल तितका वाटा केंद्राकडूनही लाभ स्वरूपात भरला जातो.>> सरकारकडून दिलं जाणारं हे कॉन्ट्रीब्युशन आयकर भरणाऱ्या किंवा सरकारच्या इतर योजनांचा लाभ घेणाऱ्यांसाठी लागू होत नाही.

टॅग्स :निवृत्ती वेतनअटलबिहारी वाजपेयीव्यवसाय