Join us
Daily Top 2Weekly Top 5

IIT मुंबई येथे आशियातील सर्वात मोठ्या बिझनेस कॉन्क्लेव्हचं आयोजन; ११-१२ डिसेंबर रोजी पार पडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 11:40 IST

आशियातील सर्वात मोठी विद्यार्थी-चालित ना-नफा संस्था, आंत्रप्रन्योरशिप सेल, आयआयटी मुंबईनं  ११ ते १२ डिसेंबर २०२५ रोजी २१ व्या ई-समिटचं आयोजन केलं आहे.

आशियातील सर्वात मोठी विद्यार्थी-चालित ना-नफा संस्था, आंत्रप्रन्योरशिप सेल, आयआयटी मुंबईनं  ११ ते १२ डिसेंबर २०२५ रोजी २१ व्या ई-समिटचं आयोजन केलं आहे. आशियातील सर्वात मोठी बिझनेस कॉन्क्लेव्ह म्हणून ओळखला जाणारा हा कार्यक्रम आजच्या उद्योजकांना आणि उद्याच्या नवोपक्रमकांना एकत्र आणतो. हे ई-समिट नव कल्पना, प्रभाव आणि शिकण्याच्या संधींनी भरलेलं एक व्यासपीठ आहे  आणि ते प्रत्येक उद्योजकासाठी खास आहे. "महान प्रवास धाडसी कल्पनांपासून सुरू होतात आणि त्या कल्पनांना आकाश देणारी जागा म्हणजे ई-समिट," असं आयोजकांनी म्हटलंय.हे दोन दिवस स्पीकर सत्रं, उच्चस्तरीय स्पर्धा , नेटवर्किंग , वर्कशॉप्स आणि प्रचंड प्रमाणात शिकण्याच्या संधींनी परिपूर्ण असतील.

प्रमुख वक्ते आणि वैशिष्ट्ये

यंदाच्या कार्यक्रमात काही प्रमुख वक्ते उपस्थित राहणार आहेत, ज्यात अनिल अग्रवाल (संस्थापक, वेदांत रिसोर्सेस), बेनेडेटो विग्ना (सीईओ, फेरारी) , अमन गुप्ता (सह-संस्थापक, बोट) , कुणाल बघेल आणि रोहित बन्सल (सह-संस्थापक, टायटन कॅपिटल), स्मृती इराणी (माजी केंद्रीय मंत्री) आणि इतर १२० पेक्षा अधिक मान्यवर व्यक्तींचा समावेश आहे.

ई-समिटची मुख्य वैशिष्ट्ये

द टेन मिनिट मिलियन : हे भारताचे पहिले ऑन-द-स्पॉट फंडिंग प्लॅटफॉर्म आहे, ज्यात स्टार्टअप संस्थापकांना १६ गुंतवणूकदारांसमोर १० मिनिटांमध्ये पिच करावं लागतं. यामध्ये ३,५०० प्रेक्षकांसमोर होणाऱ्या स्पर्धेत ३.५ दशलक्ष रुपयांची रक्कम जिंकण्याची संधी मिळते.

स्टार्टअप एक्स्पो : येथे ५०,००० पेक्षा जास्त उपस्थितांसमोर आपल्या उत्पादनाचं प्रदर्शन आणि मार्केटिंग करण्याची संधी मिळेल.

नेटवर्किंग एरिना : २०० हून अधिक गुंतवणूकदार आणि मार्गदर्शकांशी एक-ते-एक संवाद , राऊंडटेबल मेंटॉरशिप आणि सहकार्याची संधी उपलब्ध आहे.

आय-हॅक : ही फ्लॅगशिप टेक स्पर्धा आहे, ज्यात डेव्हलपमेंट आणि डेटा सायन्स ट्रॅक्समध्ये मिळून ६ लाख रुपयांचं पारितोषिक आहे.

वर्कशॉप्स : एविडिया, गूगल, मायक्रोसॉफ्ट, अपस्टॉक्स आणि वाधवानी फाऊंडेशन यांच्या वर्कशॉप्समध्ये फिजिकल एआय, गुंतवणूक, एआय एजंट्स आणि उद्योजकांसाठी साधनं अशा विविध विषयांवर सखोल प्रशिक्षण मिळेल.

विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा : आयपीएल ऑक्शन, बिड एन बिल्ड, फिश टँक, कॉर्पोरेट ड्युएल, कॅपिटल क्वेस्ट, एस द केस, डिसायपरिंग द लॅबरन आणि अनेक इतर स्पर्धांद्वारे २ लाख रुपयांपर्यंत जिंकण्याची संधी आहे.

याव्यतिरिक्त, Entre-MUN (मॉडेल युनायटेड नेशन्स अनुभव) , इन्फ्लुएंसर समिट , आणि Global Entrepreneurship Conclave (GEC) असे विशेष कार्यक्रम देखील आयोजित केले आहेत. इंटर्नशिप आणि जॉब फेअरमध्ये प्रत्यक्ष उद्योगातील अनुभव मिळण्याचीही संधी आहे.

नोंदणी आणि सवलत

या कार्यक्रमासाठी ecell.in/esummit येथे नोंदणी सुरू आहे. SUMMIT30 कोड वापरून पासेसवर ३०% सवलत आणि SUMMIT10 वापरून IIT मुंबई निवास व्यवस्थेवर १०% सवलत मिळू शकते.

प्रमुख भागीदार

वेस्टब्रिज कॅपिटल अँड स्ट्राइप (मुख्य सादरकर्ते), गुगल अ‍ॅडमॉब आणि गिटलॅब (सहभागी), क्राफ्टन (गेमिंग पार्टनर), शिवामी (क्लाउड पार्टनर), कोका-कोला (बेव्हरेज पार्टनर), पंजाब अँड सिंध बँक (स्ट्रॅटेजिक बँकिंग पार्टनर), आयसीआयसीआय लोम्बार्ड, परफिओस, एनविडिया, सिप्ला हेल्थ, जीआयआय, आरडी प्रो, अपस्टॉक्स, वाधवानी फाउंडेशन, गहना आणि इतर भागीदार.

English
हिंदी सारांश
Web Title : IIT Bombay to host Asia's largest business conclave in December.

Web Summary : IIT Bombay's E-Summit, Asia's largest business conclave, on December 11-12, 2025, unites entrepreneurs and innovators. Key speakers include Anil Agarwal and Benedetto Vigna. Highlights: The Ten Minute Million, Startup Expo, networking, I-Hack, workshops and student competitions. Registration open at ecell.in/esummit.
टॅग्स :आयआयटी मुंबईलोकमत