Join us
Daily Top 2Weekly Top 5

नातेवाईकाच्या घरात भाड्यानं राहता का? तर मग नवीन आयकर नियम जाणून घेणं आहे महत्त्वाचं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 11:38 IST

Rent House Income Tax Rule: जर तुम्ही नोकरी करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची असू शकते. 'ड्राफ्ट इनकम टॅक्स रूल्स-२०२६' मध्ये काही अशा तरतुदी करण्यात आल्या आहेत, ज्या नोकरी करणाऱ्या लोकांसाठी जाणून घेणं आवश्यक आहे.

Rent House Income Tax Rule: जर तुम्ही नोकरी करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची असू शकते. 'ड्राफ्ट इनकम टॅक्स रूल्स-२०२६' मध्ये काही अशा तरतुदी करण्यात आल्या आहेत, ज्या नोकरी करणाऱ्या लोकांसाठी जाणून घेणं आवश्यक आहे. विशेषतः अशा लोकांसाठी जे आपल्या नातेवाईकांच्या घरात भाड्यानं राहतात.

नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी आपल्या पालकांना किंवा जवळच्या नातेवाईकांना भाडं देऊन 'हाऊस रेंट अलाऊन्स' (HRA) मध्ये कर सवलत घेणं हा दीर्घकाळापासून एक वैध टॅक्स प्लॅनिंगचा मार्ग मानला जातो. आता ड्राफ्ट इनकम टॅक्स रूल्स-२०२६ मध्ये यासंदर्भात काय अपडेट आहे, ते जाणून घेऊया.

सोन्यासारखी आहे 'ही' सरकारी स्कीम; ₹१ लाख जमा केल्यावर मिळेल ₹४५,००० चं व्याज

नेमका बदल काय आहे?

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) द्वारे प्रस्तावित 'ड्राफ्ट इनकम टॅक्स रूल्स-२०२६' मध्ये मूळ नियमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, नवीन तरतुदीनुसार, जर एखादा कर्मचारी नातेवाईकाला भाडं देत असेल, तर त्याला 'फॉर्म 12BA' मध्ये घरमालकाशी असलेल्या आपल्या नात्याचा खुलासा करावा लागेल. पूर्वी फक्त घरमालकाचा पॅन (PAN) देणं बंधनकारक होतं, परंतु आता घरमालकाशी काय नातं आहे, याचीही माहिती 'रिलेशनशिप विथ लँडलॉर्ड' या कॉलम अंतर्गत द्यावी लागेल. याचा अर्थ असा की, हे नवीन नियम पालकांना किंवा नातेवाईकांना भाडं देण्यावर कोणतीही बंदी घालत नाहीत. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या पालकांना किंवा नातेवाईकांना प्रत्यक्ष भाडं देत असाल, तर काळजी करण्याचं कारण नाही.

तज्ज्ञांचं मत काय?

कर तज्ज्ञांच्या मते, हा बदल करचोरी रोखण्यासाठी करण्यात आला आहे. नातेवाईकांमधील भाड्याचे व्यवहार पारदर्शक बनवणं आणि बनावट किंवा केवळ कागदोपत्री केलेल्या दाव्यांना आळा घालणं, हा यामागचा उद्देश आहे. जर भाडेकरार (Rent Agreement) वास्तविक असेल, भाड्याचे पैसे बँक खात्याद्वारे दिले जात असतील आणि घरमालक आपल्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये (ITR) भाड्याचं उत्पन्न दाखवत असेल, तर HRA सवलत पूर्णपणे वैध राहील. मात्र, जर भाडं केवळ कागदावर दाखवलं असेल आणि प्रत्यक्षात कोणताही व्यवहार झाला नसेल, तर अशा प्रकरणांमध्ये कडक कारवाई होऊ शकते.

ऑडिटर आणि कंपन्यांची जबाबदारी वाढणार

नियमांच्या मसुद्यात परकीय उत्पन्नावर टॅक्स क्रेडिटचा दावा करण्यासाठी ऑडिटरसह कंपन्यांची जबाबदारी वाढवण्याचा प्रस्ताव आहे. परकीय उत्पन्नावरील टॅक्स क्रेडिटसाठी प्रस्तावित 'फॉर्म ४४' मध्ये ऑडिटरची भूमिका अधिक कडक करण्यात आली आहे. आता चार्टर्ड अकाउंटंटला परदेशी टॅक्स कपात प्रमाणपत्र, पेमेंटचा पुरावा आणि कर कराराच्या पात्रतेची स्वतंत्रपणे तपासणी करावी लागेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Renting from Relatives? Understand the New Income Tax Rules Now!

Web Summary : New income tax rules require employees claiming HRA for rent paid to relatives to disclose their relationship in Form 12BA. This aims to curb tax evasion by ensuring genuine rent transactions. Auditors will also face stricter scrutiny regarding foreign income tax credits.
टॅग्स :इन्कम टॅक्ससुंदर गृहनियोजन