Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही आहात का आर्थिकदृष्ट्या सुनिश्चित ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 08:47 IST

Business News: आर्थिक सुनिश्चितता म्हणजेच बक्कळ पगाराची नोकरी किव्वा उत्तम चालणारा व्यवसाय असे जर तुम्हास वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे. मग नक्की काय? हा प्रश्न तुम्हास पडला असेल. 

- डॉ. पुष्कर कुलकर्णी आर्थिक सुनिश्चितता म्हणजेच बक्कळ पगाराची नोकरी किव्वा उत्तम चालणारा व्यवसाय असे जर तुम्हास वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे. मग नक्की काय? हा प्रश्न तुम्हास पडला असेल.  जर खालील प्रश्नाची उत्तरे होय असतील तरच तुम्ही आर्थिक सुनिश्चिततेचा विचार केला आहे असे म्हणता येईल. १) तुमचा आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचा आरोग्य विमा (मेडिकलेम) आहे का? आणि असेल तर दर वर्षी त्याचे नूतनीकरण करीत आहात का?  २) तुमचा आणि कुटुंबातील व्यक्तींचा अपघात विमा आहे का? असल्यास दर वर्षी नूतनीकरण करीत आहात का? ३) ज्या व्यक्ती पैसे मिळवितात त्यांचा टर्म इन्शुरन्स आहे का? असेल तर पॉलिसी मुदत संपण्याआधी त्याचे नूतनीकरण करता का? ४) दुचाकी आणि चार चाकी वाहनाचा विमा सुरु किव्वा दर वर्षी रिन्यू केला आहे का?  ५) पीपीएफ खाते सुरु आहे का?  ६) तुम्ही एसआयपी मार्फत म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवीत आहात का? ७) तुमचे डिमॅट खाते आहे का? शेअर्स मध्ये गुंतवणूक करता का? ८) तुम्ही घर आणि दागिने यांचा इन्शुरन्स काढला आहे का? ९) कोणत्याही पेन्शन योजनेत तुम्ही रक्कम गुंतविणे सुरु केले आहे का? १०) आर्थिक अवाक आणि खर्च याचे वार्षिक नियोजन आपण केले आहे का? ११) वार्षिक आर्थिक आवक आणि खर्च तसेच मोठे खर्च जसे मुलांचे उच्च शिक्षण, लग्न, सहल यांचे नियोजन केले आहे का? वरील प्रश्न स्वतःस विचार आणि उत्तरे घ्या. उत्तरे हो असतील तर सोन्याहून पिवळे. उत्तरे जितकी 'नाही' तितके तुम्ही आर्थिक सुनिश्चित नाही असाच अर्थ निघतो.प्रत्येक सोमवारी अर्थ नीति या सदरात वरील विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाने उत्तर शोधू आणि त्याबाबत अधिक सविस्तर माहिती घेऊयात. पर्सनल फायनान्स आणि त्याचे योग्य  नियोजन केल्यास आपणासही मिळू शकते फायनान्शिअल विस्डम. 

- प्रत्येकाने स्वतःच्या आयुष्यात जसे आहार आणि आरोग्याचे नियोजन करतो तसेच दीर्घ कालीन आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. पैसा जसा चैनीची वस्तू आहे तितकाच गरजेची वस्तूही आहे - आर्थिक सुनिश्चितता म्हणजेच फायनान्शिअल विस्डम कमी किव्वा मध्य वयापासून सुरु करणे आवश्यक आहे. 

टॅग्स :पैसाव्यवसाय