वॉशिंगटन : गेल्या चार वर्षांतील भारताची वृद्धी अत्यंत मजबूत आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य अर्थतज्ज्ञ मॉरिस ऑब्स्टफेल्ड यांनी केले. भारताने लागू केलेली वस्तू व सेवा कर (जीएसटी) व्यवस्था तसेच नादारी व दिवाळखोरी संहिता (आयबीसी) यांचीही ऑब्स्टफेल्ड यांनी प्रशंसा केली आहे.६६ वर्षीय आॅब्स्टफेल्ड हे या महिन्याच्या अखेरीस नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ या पदावरून निवृत्त होत आहेत. त्यांची जागा गीता गोपीनाथ या घेणार आहेत. नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी बसणाऱ्या त्या दुसºया भारतीय ठरतील. याआधी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी हे पद सांभाळले होते. गीता गोपीनाथ यांची या पदावर आधीच नेमणूक झाली आहे. मॉरिस आॅब्स्टफेल्ड यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने काही कर रचनेसंदर्भात देशभर मूलभूत अशा सुधारणा राबविल्या आहेत. यात वस्तू व सेवाकर (जीएसटी) आणि नादारी व दिवाळखोरी संहिता (आयबीसी) यांचा समावेश आहे. वित्तीय समावेशनासाठी त्यांनी अतिशय महत्त्वाची पाऊले उचललेली आहेत. मोदी सरकारची गेल्या साडेचार वर्षांतील कामगिरी अत्यंत मजबूत राहिली आहे. या वर्षाच्या तिसºया तिमाहीत ती तितकीशी चांगली नव्हती; पण एकूण कामगिरी चांगलीच मजबूत आहे.बिगर बँक कर्ज ही मोठी जोखीमनिवडणुका आल्या, तरीही वित्तीय व्यवस्था कायम ठेवायला हवी. बिगर बँक कर्ज पुरवठा ही एक मोठी जोखीम भारतासमोर दिसत आहे. शॅडो बँकिंग या नावाने ओळखली जाणारी ही व्यवस्था सध्या संकटात आहे, असे आॅब्स्टफेल्ड म्हणाले.
नाणेनिधीकडून जीएसटी, दिवाळखोरी संहितेची प्रशंसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 04:51 IST