Join us

पेन्शन महागाई भत्त्यासह लागू करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 00:34 IST

भगतसिंग कोशियारी समितीच्या शिफारशीनुसार निवृत्ती वेतन महागाई भत्त्यासह त्वरित लागू करावे, या मागणीसाठी नागपूरच्या निवृत्त कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली ३ संघटनांचे सदस्य उद्या, मंगळवारी संसद मार्गावर धरणे धरणार आहेत.

नवी दिल्ली : भगतसिंग कोशियारी समितीच्या शिफारशीनुसार निवृत्ती वेतन महागाई भत्त्यासह त्वरित लागू करावे, या मागणीसाठी नागपूरच्या निवृत्त कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली ३ संघटनांचे सदस्य उद्या, मंगळवारी संसद मार्गावर धरणे धरणार आहेत.निवृत्त कर्मचारी समन्वय समितीचे महासचिव प्रकाश पाठक व अन्य सदस्यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ, राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना, महाराष्ट्र आणि महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटनेचे हे पदाधिकारी आहेत. आम्हाला मिळणारे निवृत्तीवेतन १००० ते २८०० रुपये आहे. ते किमान ९ हजार रुपये असले पाहिजे. भगतसिंग कोशियारी समितीच्या शिफारशीनुसार निवृत्ती वेतन महागाई भत्त्यासह लागू करावे, अशी मागणी त्यांनी केली.प्रकाश पाठक म्हणाले की, भगतसिंग कोशियारी समितीच्या अहवालानंतरही सरकार आर्थिक कारणांनी शिफारशींची अंमलबजावणी करताना दिसत नाही. त्यामुळे ५६ लाख निवृत्ती वेतन धारकांची घोर फसवणूक झाली आहे. सरकारने आमच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास निवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी निर्माण होईल.।कारभारावर नाराजीकेंद्रीय स्वास्थ्य योजना लागू केली जावी.तसेच महागाई भत्त्यासह निवृत्ती वेतन दिले जावे, ईएसआय योजना नीट चालवण्यात यावी, या मागण्यांचा विचार करण्यासाठी कोशियारी समितीची स्थापना करवून घेतली. समितीने ३ सप्टेंबर २०१३ रोजी अहवाल सादर केला.मात्र कामगार मंत्रालयाने समितीचा अहवाल लागू करता येणार नाही व अन्य मागण्याही मान्य करणे शक्य नाही. त्यामुळे संपूर्ण देशात औद्योगिक अशांतता निर्माण झालेली आहे, असे म्हटले आहे.

टॅग्स :पैसा