Join us

अ‍ॅपल प्रकरण मिटवण्यासाठी 'त्या' ग्राहकांना देणार 817 कोटी रुपयांची नुकसान भरपाई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 01:45 IST

Apple to pay ₹815 crore to settle case: अ‍ॅपल कंपनीवर ग्राहकांनी गंभीर आरोप केला असून, हे प्रकरण मिटवण्यासाठी कंपनी 817 कोटी रुपये देण्यास तयार झाली आहे. 

Apple news: पाच वर्षांपूर्वी काही लोकांनी एकत्र येऊन Apple कंपनीविरोधात खटला दाखल केला. हे प्रकरण होतं ग्राहकांच्या संमतीशिवाय त्यांच्या गोष्टी ऐकण्याचे. याच संबंधात एक लॉ सूट दाखल करण्यात आला होता. apple कंपनी आता हे प्रकरण मिटवू इच्छिते आणि त्यासाठी नुकसान भरपाई म्हणून ९५ मिलियन अमेरिकी डॉलर्स म्हणजे तब्बल ८१७ कोटी रुपये देण्यास तयार झाली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

अ‍ॅपल कंपनीवर असा आरोप करण्यात आला होता की, कंपनी आयफोनमध्ये असलेल्या Siri या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून त्यांच्या गोपनियतेशी छेडछाड करत आहे. Siri हे अ‍ॅपलचे व्हर्च्युअल असिस्टंट फीचर आहे, जे प्रत्येक स्मार्टफोन आणि अ‍ॅपलच्या इतर डिव्हाईसेसमध्ये असते. 

या क्लास अ‍ॅक्शन लॉ सूटमध्ये अ‍ॅपल कंपनीवर आरोप केले गेले की, Siri च्या माध्यमातून कंपनी त्यांच्या यूजर्सच्या गोष्टी ऐकते, त्याही यूजर्सच्या परवानीशिवाय. Siri यूजर्सची परवानगी न घेता, ते जे बोलतात, त्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करते. यूजर्सचा रेकॉर्डिंग जाहिरातदारांशी शेअर करण्यात आल्याचाही आरोप आहे. 

कोणत्या अ‍ॅपल यूजर्संना नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता?

17 सप्टेंबर 2014 ते 31डिसेंबर 2024 या काळात खरेदी करण्यात आलेल्या अ‍ॅपलच्या अशा डिव्हाईसेस यूजर्संन ज्यात Siri एनेबल्ड होते. त्यांना नुकसान भरपाई मिळू शकते, असे रिपोर्टस आहेत. जर या तडजोडीला मंजुरी मिळाली, तर कंपनी अशा प्रत्येक यूजर्स २० डॉलर्स (१७२० रुपये) देईल. 

या डिव्हासेसमध्ये आयफोन, आयपॅडस्, अ‍ॅपल वॉचेस्, मॅकबुक्स, होमपोड्स, आयपॉड टच आणि अ‍ॅपल टीव्ही आदींचा समावेश आहे. सर्व यूजर्स त्यांचा दावा करू शकतात. 

अ‍ॅपल नुकसान भरपाई देण्यास तयार आहे. पण, यासंदर्भात शेवटची सुनावणी १ फेब्रुवारी रोजी होणार आहे. याच दिवशी जर तडजोडीला मंजुरी मिळाली, तर अ‍ॅपल त्या संबंधित यूजर्संना सूचना पाठवेल. ज्यांना भरपाई म्हणून मिळणार आहे, त्यांची प्रायव्हेट कॉल्स कायमची डिलीट केली जाईल. 

टॅग्स :अॅपलअ‍ॅपल मेगा लाँचव्यवसायन्यायालय