Join us

उद्योग जगतात Apple नं रचला इतिहास; ३ ट्रिलियन डॉलर्स मार्केट व्हॅल्यू असलेली ठरली नंबर वन कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 09:20 IST

Apple 3 Trillion Dollar Market Value Company : दिग्गज टेक कंपनी Apple नं मोठा इतिहास रचला आहे.

दिग्गज टेक कंपनी Apple नं इतिहास रचला आहे. सोमवारी कंपनीची मार्केट व्हॅल्यू ३ ट्रिलियन डॉलर्स इतकी झाली. वॉलमार्ट, डिझ्नी, नेटफ्लिक्स, नायकी, एक्सॉन मोबिल, कोका-कोला, कॉमकास्ट, मार्गन स्टॅनले, मॅकडोनाल्ड्स, एटीअँडटी, गोल्टमॅन सॅक्स, बोईंग, आयबीएम आणि फोर्डच्या तुलनेत Apple या कंपनीची मार्केट व्हॅल्यू अधिक आहे. 

द न्यूयॉर्क टाईम्सनुसार १९७६ मध्ये सुरू झालेल्या अॅपल या कंपनीनं २०१८ मध्ये १ ट्रिलियन डॉलर्सचा जादुई आकडा पार केला होता. इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना ४२ वर्षांची मोठी वाट पाहावी लागली होती.

यासोबतच दोन वर्षांनंतर कंपनीची मार्केट व्हॅल्यू २ ट्रिलियन डॉलर्सपेक्षाही पेक्षाही अधिक झाली. तर ३ ट्रिलियनचा आकडा गाठण्यासाठी कंपनीला केवळ १६ महिने आणि १५ दिवसांचा कालावधी लागला. तीन ट्रिलयन डॉलर्सची मार्केट व्हॅल्यू पार करणारी अॅपल ही पहिली कंपनी ठरली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अॅपलच्या शेअरच्या (Apple Shares) किंमतीतही वाढ होताना दिसत आहे. कोरोनाच्या महासाथीनंतरही iPhone उत्पादक कंपनी अॅपलच्या शेअर्समध्ये सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. कंपनीला लॉकडाऊनदरम्यानही मओठा फायदा झाल्याचं दिसून आलं. काम, शिक्षण, मनोरंजनाशी जोडलं जाण्यासाठी कंपनीच्या वस्तूंची मागणीही वाढताना दिसून आली. 

टॅग्स :अॅपलव्यवसाय