Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनुपम मित्तल यांची मोठी घोषणा; कर्मचाऱ्यांना 'WFH', वर्षभरात करणार ३०,००० लिटर पेट्रोलची बचत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 09:55 IST

कर्मचाऱ्यांना 'Work From Home' देऊन वर्षभरात ३०,००० लिटर पेट्रोलची बचत!

Work From Home: प्रसिद्ध उद्योगपती आणि 'शादी डॉट कॉम'चे (Shaadi.com) संस्थापक अनुपम मित्तल सध्या सोशल मीडियावर त्यांच्या एका महत्त्वपूर्ण निर्णयामुळे चर्चेत आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच इंधन बचतीचे आवाहन केले होते, त्याला प्रतिसाद देत मित्तल यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातून एक दिवस 'वर्क फ्रॉम होम' देण्याची घोषणा केली आहे.

प्रत्येक 'बुधवारी' घरून काम

अनुपम मित्तल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर माहिती दिली की, त्यांच्या कंपनीत आता दर बुधवारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची गरज नाही. हा निर्णय केवळ कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी नसून, त्यामागे 'इंधन बचत' आणि 'राष्ट्र उभारणी' हा मोठा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

३० हजार लिटर पेट्रोलची बचत

अनुपम मित्तल यांनी हा निर्णय घेताना एक गणित मांडले. त्यांच्या पोस्टनुसार, कंपनीतील सुमारे ५०० कर्मचारी जर आठवड्यातून एक दिवस घरून काम करतील, तर प्रवासाचा खर्च वाचेल. या एका दिवसाच्या सुटीमुळे वर्षभरात अंदाजे ३० हजार लिटर पेट्रोलची मोठी बचत होऊ शकते.

मित्तल यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, कधी विचार केला नव्हता, पण ५०० कर्मचाऱ्यांसाठी दिवसाचा रिमोट वर्क वर्षाला ३० हजार लिटर पेट्रोल वाचवू शकतो. राष्ट्र उभारणीसाठी नेहमीच मोठ्या बलिदानाची गरज नसते, तर रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी करूनही आपण चांगली सुरुवात करू शकतो.

छोटे पाऊल, प्रामाणिक हेतू

या निर्णयाला त्यांनी "Small step, True intent" (छोटे पाऊल पण प्रामाणिक हेतू) असे म्हटले आहे. पर्यावरणाचे रक्षण आणि देशाच्या इंधन आयातीवरील भार कमी करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

दरम्यान, अनुपम मित्तल यांच्या या निर्णयाचे सोशल मीडियावर जोरदार स्वागत होत आहे. लाखो युजर्सनी या पोस्टला पसंती दिली असून, इतर कंपन्यांनीही अशाच प्रकारचे निर्णय घ्यावेत, अशी मागणी केली जात आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Anupam Mittal's WFH move saves 30,000 liters of petrol.

Web Summary : Shaadi.com founder Anupam Mittal announced 'Work From Home' every Wednesday. This initiative aims to save 30,000 liters of petrol annually with 500 employees working remotely, supporting fuel conservation and nation-building. The move has been widely praised.
टॅग्स :पेट्रोलडिझेलखनिज तेलनरेंद्र मोदी