Join us

४ बोनस शेअर्स देण्याची घोषणा; ६५०% वाढलाय Jindal समूहाच्या कंपनीचा शेअर, तुमच्याकडे आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 14:51 IST

Jindal Group Share Price: कंपनी प्रत्येक १ शेअरमागे ४ बोनस शेअर्स देणार आहे. स्मॉलकॅप कंपनी जिंदाल वर्ल्डवाइडचा शेअर बुधवारी बीएसईवर ४ टक्क्यांहून अधिक वधारून ४७०.९५ रुपयांवर पोहोचला.

Jindal Group Share Price: बीसी जिंदाल समूहाची कंपनी जिंदाल वर्ल्डवाइड लिमिटेडनं आपल्या भागधारकांना मोठी भेट जाहीर केली आहे. जिंदाल वर्ल्डवाइड लिमिटेडनं आपल्या गुंतवणूकदारांना १:४ या प्रमाणात बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच कंपनी प्रत्येक १ शेअरमागे ४ बोनस शेअर्स देणार आहे. स्मॉलकॅप कंपनी जिंदाल वर्ल्डवाइडचा शेअर बुधवारी बीएसईवर ४ टक्क्यांहून अधिक वधारून ४७०.९५ रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्सनीही ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला आहे.

पाच वर्षांत ६५० टक्क्यांची वाढ

जिंदाल वर्ल्डवाइडच्या शेअरमध्ये गेल्या ५ वर्षांत ६५० टक्के वाढ झाली आहे. १० जानेवारी २०२० रोजी कंपनीचा शेअर ६२.७० रुपयांवर होता. जिंदाल वर्ल्डवाइडचा शेअर ८ जानेवारी २०२५ रोजी ४७०.९५ रुपयांवर पोहोचला. तर गेल्या ४ वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये ६९० टक्क्यांहून अधिक वाढ झाली. या काळात कंपनीचे शेअर्स ५८ रुपयांवरून ४७० रुपयांपर्यंत वधारले आहेत. जिंदाल वर्ल्डवाइड लिमिटेडच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर २६८ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप ९००० कोटी रुपयांच्या पुढे गेलंय.

गेल्या दहा वर्षांत जिंदाल वर्ल्डवाइडचे शेअर्स चार हजार टक्क्यांनी वधारले आहेत. ८ जानेवारी २०१५ रोजी कंपनीचा शेअर ११.१४ रुपयांवर होता. जिंदाल वर्ल्डवाइड लिमिटेडचा शेअर ८ जानेवारी २०२५ रोजी ४७०.९५ रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर जिंदाल वर्ल्डवाइडच्या शेअरमध्ये गेल्या दोन महिन्यांत ५५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. जिंदाल वर्ल्डवाइड लिमिटेड १८,००० कोटी रुपयांच्या बीसी जिंदाल समूहाचा भाग आहे. 

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकाची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक