Anil Ambani Reliance Home Finance: सोमवारी शेअर बाजारात तेजी दिसून आली. दुपारच्या सुमारास सेन्सेक्स ६०० अंकांच्या वर व्यवहार करत होता. गेल्या काही दिवसांपासून अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देत आहेत. अनिल अंबानींची कंपनी रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडनं (Reliance Home Finance Ltd) एका महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केलेत. मात्र आज त्यात काही प्रमाणात घसरण दिसून आली.
सोमवारी कंपनीच्या शेअरला लोअर सर्किट लागलं. म्हणजेच हा शेअर २ टक्क्यांनी घसरून ७.५४ रुपयांवर आला. यापूर्वी, या शेअरनं एका महिन्यात गुंतवणूकदारांना १०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. एका महिन्यापूर्वी त्याची किंमत ३.३० रुपये होती. आता ती ७.५४ रुपये आहे. अशा परिस्थितीत, शेअरनं एका महिन्यात सुमारे १२८ टक्के परतावा दिलाय. जर तुम्ही महिन्यापूर्वी त्याचे १ लाख रुपयांचे शेअर्स खरेदी केले असते, तर त्यांची किंमत आज २.२८ लाख रुपये असती.
सोनं झालं 'लखपती', Gold-Silver चे दर गगनाला भिडले; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवी किंमत
५ वर्षात किती परतावा?
या शेअरनं दीर्घकाळात गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिलाय. जर आपण ५ वर्षांच्या परताव्याबद्दल बोललो तर तो सुमारे ३०० टक्के आहे. म्हणजेच ५ वर्षात शेअरनं गुंतवणुकीवर तिप्पट परतावा दिलाय. जर तुम्ही ५ वर्षांपूर्वी त्यात १ लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचं मूल्य सुमारे ४ लाख रुपये झालं असतं. म्हणजेच १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला ५ वर्षांत ३ लाख रुपयांचा नफा झाला असता.
तज्ज्ञांचं मत काय?
तज्ज्ञांच्या मते, कंपनीची फंडामेंटल्स कमकुवत आहेत. ट्रेंडलाइनच्या आकडेवारीनुसार, कंपनी सध्या मजबूत आर्थिक स्थितीत नाही. अनिल अंबानींच्या रिलायन्स होम फायनान्स कंपनीला चौथ्या तिमाहीत ६८.८ लाख रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे. तथापि, कंपनी अजूनही तोट्यात आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ६७४.९ लाख रुपयांचा तोटा झाला होता. अशा परिस्थितीत, कंपनीनं गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ९० टक्क्यांनी तोटा कमी केला आहे, जो एक चांगला संकेत आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)