Join us

अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 10:59 IST

Reliance Industries Anant Ambani: अनंत अंबानी सध्या कंपनीत नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून कार्यरत होते. आता ते रिलायन्सच्या कार्यकारी नेतृत्वाचा भाग असतील.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालक मंडळाची शुक्रवारी बैठक पार पडली. या बैठकीत अनंत अंबानी यांची १ मे २०२५ पासून कंपनीच्या कार्यकारी संचालकपदी (Executive Director) नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ही नियुक्ती पाच वर्षांसाठी करण्यात आली असून भागधारकांच्या मान्यतेनंतर त्याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. रिलायन्सच्या दीर्घकालीन उत्तराधिकार योजनेअंतर्गत हे पाऊल उचलण्यात आले आहे.

अनंत अंबानी सध्या कंपनीत नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून कार्यरत होते. आता ते रिलायन्सच्या कार्यकारी नेतृत्वाचा भाग असतील. स्वच्छ इंधन, कार्बन कॅप्चर तंत्रज्ञान, पुनर्वापर आणि क्रूड-टू-केमिकल्स सारख्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांसह २०३५ पर्यंत नेट झिरो कार्बन कंपनी बनण्याचं रिलायन्सचं ध्येय आहे.

EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

अनंत अंबानी मार्च २०२० पासून जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडच्या संचालक मंडळावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून त्यांनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या संचालक मंडळात योगदान देण्यास सुरुवात केली. याशिवाय जून २०२१ पासून ते रिलायन्स न्यू एनर्जी लिमिटेड आणि रिलायन्स न्यू सोलर एनर्जी लिमिटेडच्या संचालक मंडळावरही आहेत. सप्टेंबर २०२२ पासून ते रिलायन्स फाऊंडेशनच्या संचालक मंडळावरही आहेत. ब्राऊन युनिव्हर्सिटीचे पदवीधर अनंत यांना कंपनीच्या अनेक महत्त्वाच्या क्षेत्रात नेतृत्वाचा अनुभव आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये कार्यकारी संचालकपद मिळविणारे अनंत अंबानी कुटुंबातील पहिले सदस्य आहेत. मात्र त्यांचे बंधू आकाश अंबानी २०२२ पासून जिओ इन्फोकॉमचे चेअरमन आहेत आणि त्यांची बहीण ईशा अंबानी-पिरामल रिलायन्स रिटेल व्यवसायाचे नेतृत्व करत आहेत.

टॅग्स :रिलायन्सअनंत अंबानी