Join us  

PM मोदींची भेट; 41 हजार कोटींच्या प्रकल्पांचा शुभारंभ, 554 रेल्वे स्थानकांचे रुपडे पालटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 4:19 PM

Amrit Bharat Station Scheme: देशातील 554 रेल्वे स्थानकांमध्ये 'वर्ल्ड क्लास' सुविधा मिळणार, महाराष्ट्रातील 56 स्थानकांचा समावेश.

Amrit Bharat Station Scheme: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज(दि.26) दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 41,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या सुमारे 2000 रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. यावेळी त्यांनी अमृत भारत स्टेशन (Amrit Bharat Station Scheme) योजनेअंतर्गत 554 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणीदेखील केली. 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या या स्थानकांचा 19,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून पुनर्विकास केला जाईल. 

554 स्थानकांचे स्वरूप बदलणार प्रवाशांचा प्रवास सुखकर सुधारण्यासाठी अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत 554 स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्याची पायाभरणी आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आली. यासोबतच भारतभर ओव्हरब्रिज आणि अंडरपासचेही उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, भारत आता मोठी स्वप्ने पाहतोय आणि ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस कामही करतोय. या कामांमुळे लोकांचे जीवन अधिक सुलभ होईल. 

19000 कोटींहून अधिक किमतीचा प्रकल्प27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या या स्थानकांचा 19,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून पुनर्विकास केला जाईल. ही स्थानके शहराच्या दोन्ही बाजूंना एकत्रित करून 'सिटी सेंटर' म्हणून काम करतील. या स्थानकांमध्ये रुफटॉप प्लाझा, सुंदर लँडस्केप, इंटर मॉडेल कनेक्टिव्हिटी, सुधारित आधुनिक दर्शनी भाग, मुलांसाठी खेळण्याची जागा, किओस्क, फूड कोर्ट इत्यादी आधुनिक सुविधा असतील. पर्यावरणस्नेही आणि अपंगांसाठी अनुकूल असा पुनर्विकास केला जाईल. स्थानकांच्या इमारतींची रचना स्थानिक संस्कृती, वारसा आणि स्थापत्यकलेतून प्रेरित असेल.

कोणत्या राज्यातील किती स्टेशनचा समावेश?

1500 रोड ओव्हर ब्रिजचे उद्घाटन आणि पायाभरणीयावेळी पंतप्रधानांनी 1500 रोड ओव्हर ब्रिज आणि अंडरपासचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. हे रस्ते ओव्हर ब्रिज आणि अंडरपास 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेले आहेत. या प्रकल्पांची एकूण किंमत अंदाजे 21,520 कोटी रुपये आहे.

टॅग्स :नरेंद्र मोदीभारतीय रेल्वेकेंद्र सरकारव्यवसायगुंतवणूकभाजपा