Join us  

अमेरिकेच्या क्रेडिट रेटिंगमुळे अब्जाधीशांची संपत्ती घटली! मस्कपासून अदानीपर्यंत सर्वांचे मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2023 1:26 PM

इलॉन मस्क ते गौतम अदानी यांच्यापर्यंत जगातील २२ अब्जाधीशांच्या संपत्तीत ३ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.

शेअर मार्केटमध्ये नेहमी चढउतार होत असतात. काल बुधवारी भारताबरोबरच जगभरातील शेअर बाजार कोसळल्याचे दिसून आले. यामुळे जगातील  २२ अब्जाधीशांच्या संपत्तीचे मोठे नुकसान झाले. जगातील सर्वोच्च २२ अब्जाधीशांच्या संपत्तीत एकाच वेळी घट झाल्याचे क्वचितच दिसले. या अब्जाधीशांच्या संपत्तीत संयुक्तपणे ३ लाख कोटी रुपयांनी म्हणजेच ३६ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त घट झाली आहे. यामध्ये सर्वात जास्त नुकसान इलॉन मस्क आणि बर्नार्ड अर्नॉल्ट यांचे झाले आहे. तर दुसरीकडे, भारतातील मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यासह टॉप १४ अब्जाधीशांच्या संपत्तीत घट झाली आहे. 

RBI नं चार सरकारी कंपन्यांना ठोठावला २००० कोटींचा दंड, पाहा काय आहे प्रकरण

जगातील अव्वल २२ अब्जाधीशांच्या संपत्तीत एकाचवेळी घट झाल्याचे कधीतरच पाहायला मिळते. काल बुधवारी पाहायला मिळाले. इलॉन मस्क ते गौतम अदानी यांच्यापर्यंत जगातील २२ अब्जाधीशांच्या संपत्तीत ३ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. जर आपण डॉलरमध्ये पाहिले तर हा आकडा ३६ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. इलॉन मस्क व्यतिरिक्त बेझोस, झुकेरबर्ग, बिल गेट्स, अंबानी आणि भारतातील अदानी यांचाही या यादीत समावेश आहे.

जर आपण टॉप १० अब्जाधीशांमध्ये सर्वात मोठी घसरण इलॉन मस्कच्या संपत्तीत दिसून आली. बुधवारी, मस्क यांची एकूण संपत्ती सुमारे  ५ अब्ज डॉलरने कमी होऊन  २३३ अब्ज डॉलर झाली आहे. मस्क यांच्या नेट वर्थमध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. बर्नार्ड अर्नॉल्टच्या संपत्तीत ४ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त घट झाली आहे. जेफ बेझोस यांच्या संपत्तीत ३.५३ ने घट झाली आहे. वॉरेन बफेच्या संपत्तीत सर्वात कमी घट झाली आणि ४१६ मिलियनने नुकसान झाले. तर लॅरी एलिसन, लॅरी पेज, मार्क झुकरबर्ग, स्टीव्ह बाल्मर, सर्जी ब्रिन यांच्या संपत्तीत २ ते ३ अब्ज डॉलरची घट झाली आहे.

याचा परिणाम भारतातील उद्योगपींच्या संपत्तीवरही परिणाम आहे. मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या संपत्तीतही घट झाली आहे. आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत १.२७ अब्ज डॉलरची घट झाली आहे. त्यानंतर त्यांची एकूण संपत्ती ९४.५ बिलियन डॉलर झाली आहे. तर गौतम अदानी यांच्या संपत्तीत १.०८ अब्ज डॉलरची घट झाली आहे आणि एकूण संपत्ती ६२.८ बिलियन डॉलरवर आली आहे. या दोघांशिवाय शापूर मिस्त्री, शिव नादर अझीम प्रेमजी, लक्ष्मी मित्तल यांसारख्या १९ अब्जाधीशांच्या संपत्तीत घट झाली आहे. तर ४ अब्जाधीशांच्या संपत्तीत वाढ झाली आहे.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारएलन रीव्ह मस्कगौतम अदानीमुकेश अंबानी