Join us

Amazone वरुन ऑर्डर करणे महागणार! 'या' ग्राहकांना मोजावे लागणार जास्तीचे ४९ रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 16:59 IST

amazon processing fees : देशातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनने एक मोठा निर्णय घेतला असून, याचा ग्राहकांना धक्का बसला आहे. यापुढे ग्राहकांना ऑर्डर करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतील.

amazon processing fees : तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करणे आवडत असेल तर यापुढे अधिक पैसे मोजावे लागणार आहे. देशातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनने एक मोठा निर्णय घेतला असून, ग्राहकांना धक्का बसला आहे. वास्तविक, अ‍ॅमेझॉनवरून खरेदी करणाऱ्या लोकांना आता प्रोसेसिंग फी म्हणून ४९ रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. ज्यामुळे लोकांसाठी अ‍ॅमेझॉनवरून खरेदी करणे महाग होईल. परंतु, हा नियम सर्व ग्राहकांना लागू होणार नाही.

या ग्राहकांना द्यावे लागतील अतिरिक्त ४९ रुपये अ‍ॅमेझॉनने ४९ रुपये नवीन प्रोसेसिंग फी सर्व ग्राहकांसाठी लागू केली नाही. जे ग्राहक इन्स्टंट बँक डिस्काउंट म्हणजेच IBD वापरतात, म्हणजेच जर तुम्ही बँक ऑफरद्वारे पेमेंट करत असाल तर तुम्हाला प्रोसेसिंग फी म्हणून ४९ रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. या प्रकरणात, अ‍ॅमेझॉनने म्हटले आहे की हे शुल्क त्यांच्या प्लॅटफॉर्मवर 'बँक सवलत ऑफर एकत्रित करणे, व्यवस्थापित करणे आणि प्रक्रिया करणे' यामध्ये झालेला खर्च कव्हर करण्यास मदत करते.

अ‍ॅमेझॉननची प्रोसेसिंग फी ४९ रुपये अ‍ॅमेझॉन प्राइम सदस्यांसाठी देखील लागू करण्यात आली आहे. आपण ऑर्डर रद्द केली किंवा वस्तू परत केली तरीही, हे शुल्क आपल्याला परत केले जाणार नाही. याशिवाय ४९ रुपयांचे हे प्रोसेसिंग शुल्क केवळ ५०० रुपयांपेक्षा जास्त सवलतीवर भरावे लागेल.

अ‍ॅमेझॉन सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक अ‍ॅमेझॉन हे जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक आहे. अ‍ॅमेझॉनची स्थापना जेफ बेझोस यांनी १९९४ मध्ये केली. सुरुवातीला अ‍ॅमेझॉन ही फक्त एक ऑनलाइन पुस्तक विक्री करणारी वेबसाइट होती. पण नंतर त्यांनी आपली उत्पादने वाढवली. आज अ‍ॅमेझॉनवर जवळजवळ सर्व काही उपलब्ध आहे. अ‍ॅमेझॉनवर पुस्तके, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, खेळणी, फर्निचर आणि बरेच काही मिळते. तर अ‍ॅमेझॉन प्राइम सदस्यांना अनेक फायदे मिळतात, जसे की मोफत जलद वितरण, प्राइम व्हिडिओ आणि प्राइम म्युझिक. 

टॅग्स :अ‍ॅमेझॉनऑनलाइनफ्लिपकार्ट