Join us

Amazonचे शेअर्स विक्रमी उच्चांकावर, ५ अब्ज डॉलर्सचे शेअर्स विकणार फाऊंडर Jeff Bezos

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 10:51 IST

अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी Amazon.com चे २.५ कोटी अतिरिक्त शेअर्स विकण्याची योजना जाहीर केली आहे. या शेअर्सची सध्याची किंमत ५ अब्ज डॉलर आहे.

अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी Amazon.com चे २.५ कोटी अतिरिक्त शेअर्स विकण्याची योजना जाहीर केली आहे. या शेअर्सची सध्याची किंमत ५ अब्ज डॉलर आहे. अॅमेझॉनच्या शेअरनं नुकताच विक्रमी उच्चांक गाठला. अमेरिकन शेअर बाजारांना दिलेल्या फाइलिंगमधून ही माहिती मिळाली आहे.

बेजोस यांनी फेब्रुवारीमध्ये नऊ दिवसांत ८.५ अब्ज डॉलरचे शेअर्स विकले. २०२१ नंतर त्यांनी पहिल्यांदाच कंपनीचा शेअर विकला. ब्लूमबर्ग बिलियनियर इंडेक्सच्या अंदाजानुसार, अतिरिक्त शेअर्सच्या विक्रीमुळे हा आकडा १३.५ अब्ज डॉलरवर जाईल.

नुकत्याच केलेल्या शेअर्सच्या विक्रीनंतरही बेझोस यांच्याकडे अ‍ॅमेझॉनमध्ये ९.१२ कोटी शेअर्स म्हणजेच ८.८ टक्के हिस्सा असेल. ब्लूमबर्ग वेल्थ इंडेक्सनुसार बेजोस २२१.६ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत आणि ब्लू ओरिजिन (Blue Origin) आणि वॉशिंग्टन पोस्ट  (Washington Post) या अंतराळ संशोधन कंपन्यांचे मालक आहेत.

शेअरची स्थिती काय?

अ‍ॅमेझॉनचा शेअर २ जुलै रोजी २०० डॉलरवर बंद झाला, जो १९९७ मध्ये कंपनीच्या लिस्टिंगनंतरचा उच्चांकी स्तर आहे. या वर्षी कंपनीचे शेअर्स ३२ टक्क्यांनी वधारले असून कंपनीच्या क्लाऊड व्यवसायाला जेनेरेटिव्ह एआय तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे. बेझोस यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सिएटल भागातून मियामी येथे शिफ्ट होत असल्याची घोषणा केली होती. खरं तर, वॉशिंग्टनमध्ये २०२२ मध्ये ७% कॅपिटल गेन्स टॅक्स होता, तर फ्लोरिडामध्ये ते नव्हतं. म्हणजेच बेझोस निवासस्थान बदलून मोठ्या प्रमाणावर कर वाचवू शकतील.

टॅग्स :अ‍ॅमेझॉनशेअर बाजार