Join us

दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 13:10 IST

Amazon Layoffs News : कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे अनेक कामे वेगवान झाली असली तरी आता यामुळे अनेकांच्या नोकऱ्या जात आहेत.

Amazon Layoffs News : या वर्षात अनेक दिग्गज कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये कर्मचारी कपात केली आहे. गुगल, मायक्रोसॉफ्ट, मेटापासून टीसीएस, इन्फोसिसपर्यंत. यात आणखी एका कंपनीची भर पडली आहे. जगभरातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक असलेल्या अमेझॉनने पुन्हा एकदा कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. दिवाळीच्या काही दिवस आधी आलेल्या या बातमीमुळे शेकडो कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः एचआर विभागात सर्वात मोठी कपात होण्याची शक्यता आहे.

एचआर विभागात १५% कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार

  • फॉर्च्यून वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या रिपोर्टनुसार, अमेझॉन आपल्या एचआर डिपार्टमेंटमधील १५ टक्के कर्मचाऱ्यांची नोकरी कमी करण्याची तयारी करत आहे. या कर्मचारी कपातीमुळे एचआर विभागात काम करणारे कर्मचारी सर्वाधिक प्रभावित होतील.
  • माहितीनुसार, अमेझॉनच्या एचआर टीममध्ये जागतिक स्तरावर १०,००० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. यातील १५ टक्के म्हणजे मोठी संख्या प्रभावित होण्याची शक्यता आहे.
  • कंपनीकडून अद्याप या कपातीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, तसेच प्रभावित कर्मचाऱ्यांची अचूक संख्या आणि कपातीचा वेळ स्पष्ट झालेला नाही.

यापूर्वी काही महिन्यांपूर्वी अमेझॉनने ग्राहक उपकरण समूह, वंडरी पॉडकास्ट शाखा आणि अमेझॉन वेब सर्व्हिसेस यांसारख्या टीममध्येही छोटी कपात केली होती.

कर्मचारी कपातीचे कारणअमेझॉन सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्लाउड ऑपरेशनमध्ये अब्जावधी डॉलर्सची मोठी गुंतवणूक करत आहे.कंपनीने या वर्षी कॅपिटल इन्व्हेस्टमेंटवर १०० अब्ज डॉलरपेक्षा जास्त खर्च करण्याची योजना आखली आहे. या गुंतवणुकीचा मोठा भाग अंतर्गत वापरासाठी आणि एंटरप्राइज ग्राहकांसाठी AI इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्यावर खर्च केला जाईल.सीईओ अँडी जेसी यांनी जूनमध्ये कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या एका पत्रात स्पष्ट केले होते की, पुढील युग हे AI द्वारे परिभाषित केले जाईल आणि कंपनी या बदलांसाठी तयार आहे.

वाचा - सोने नव्हे, चांदीची किंमत 'रॉकेट' वेगाने का वाढतेय? पांढरा धातू २,६९,००० प्रति किलोवर पोहोचणार?

सीईओ जेसी यांचा स्पष्ट इशारासीईओ अँडी जेसी यांनी कर्मचाऱ्यांना AI अभियानाचा स्वीकार करण्याचे आवाहन केले होते. ते म्हणाले होते की, जे कर्मचारी हे परिवर्तन स्वीकारतील, AI च्या क्षमतांचा उपयोग करतील, ते कंपनीला नव्याने आकार देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील.परंतु, याच संदेशात त्यांनी एक इशारा दिला होता. ते म्हणाले होते, "कंपनीमध्ये AI चा व्यापक वापर झाल्यामुळे कार्यक्षमतेत वाढ होईल आणि त्यामुळे आमच्या एकूण कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे."सीईओच्या या इशाऱ्यानंतर आता एचआर विभागात होणारी ही मोठी कपात थेट AI आणि कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या कंपनीच्या धोरणाशी जोडली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Amazon Layoffs: Tech Giant to Cut 15% of HR Staff?

Web Summary : Amazon may cut 15% of its HR staff globally amid AI investments. Following tech companies like Google and Meta, Amazon's potential layoffs before Diwali raise concerns. CEO hinted at workforce reduction due to AI efficiency.
टॅग्स :अ‍ॅमेझॉनकर्मचारीनोकरी