Join us

अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्ट, रिलायन्सला हादरा! Tata लवकरच Neu App लाँच करणार; काय हवे ते मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 13:51 IST

Tata Neu App Launch Soon: रतन टाटांची कंपनी तीन दिवसांत मोठा धमाका करणार आहे.  गुगुल प्ले स्टोअरवर या अ‍ॅपचे पेज लाईव्ह झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून कंपनी सतत या बाबत हिंट देत होती.

रतन टाटांचीटाटा कंपनी येत्या तीन दिवसांत एक नवीन अ‍ॅप घेऊन येत आहे. हे एक सुपर अ‍ॅप असणार आहे. याद्वारे भारतीयांना एक दोन नाही तर अनेक सेवा मिळणार आहेत. टाटा कंपनीने रिटेल क्षेत्रात धुमाकूळ करणारे Tata Neu च्या लाँच डेटची घोषणा केली आहे. 

टाटा निऊ हे अ‍ॅप येत्या ७ एप्रिलला लाँच केले जाणार आहे. गुगुल प्ले स्टोअरवर या अ‍ॅपचे पेज लाईव्ह झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून कंपनी सतत या बाबत हिंट देत होती. नुकत्याच सुरु झालेल्या आयपीएल २०२२ मध्ये देखील हे अ‍ॅप दाखविण्यात आले आहे. सध्या ते टाटाच्या कर्मचाऱ्यांपुरतेच मर्यादित वापरले जात आहे. 

हे टाटाचे सुपर अ‍ॅप आहे, जे टाटाच्या डिजिटलमधील सर्व सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर आणणार आहे. यामध्ये डिजिटल कंटेंट, पेमेंट सुविधा, फायनान्स मॅनेजमेंट, प्रवास आणि हॉटेलिंगची सेवा दिली जाणार आहे. अ‍ॅपवर तुम्हाला टाटा समूहाच्या विविध डिजिटल सेवा मिळतील. त्याच्या मदतीने, तुम्ही एअर एशिया इंडिया, एअर इंडिया किंवा ताज ग्रुपच्या हॉटेल्समध्ये रुम व फ्लाइटचे तिकीट बुक करू शकणार आहात. 

याशिवाय ग्राहकांना वापरकर्त्यांना किराणा सामानासाठी बिग बास्केट, औषधासाठी 1mg, इलेक्ट्रिक वस्तूंसाठी क्रोमा आणि इतर टाटा वेबसाइटवर प्रवेश मिळेल. तसेच या अ‍ॅपवर पैसे खर्च केल्यावर, तुम्हाला Neu कॉइन्स मिळतील, जे तुम्ही रिडीम करू शकाल. Tata Neu वर, तुम्हाला पेमेंट, मनी ट्रान्सफर आणि इतर पैसे संबंधित कामांसाठी Tata Pay UPI चा पर्याय मिळेल.

कोण कोण तगडे भिडू आहेत स्पर्धेत...अशी अनेक अ‍ॅप्स भारतात आधीपासूनच अस्तित्वात आहेत. Amazon, Paytm, Reliance Jio ने त्यांची सुपर अ‍ॅप्स तयार केली आहेत. जिथे तुम्हाला अनेक सेवा मिळतात. या अ‍ॅप्सच्या मदतीने तुम्ही पेमेंट, कंटेंट स्ट्रीमिंग, शॉपिंग, ट्रॅव्हल बुकिंग, किराणा सामान आणि इतर गोष्टी करू शकता. 

टॅग्स :टाटाअ‍ॅमेझॉनरिलायन्सफ्लिपकार्ट