ई-कॉमर्स कंपनी Amazon नं आपल्या App चा आयकॉन काही दिवसांपूर्वी बदलला होता. परंतु त्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी त्या आयकॉनवरून Amazon ला ट्रोल केलं. काही नेटकऱ्यांनी त्याची तुलना हिटलरच्या मिशांशी केली होती. त्यानंतर कंपनीनं त्वरित यावर कार्यवाही करत आपला आयकॉन पुन्हा एकदा चेंज केला. फॉक्स टीव्हीच्या वृत्तानुसार हिटलरच्या मिशांशी मिळताजुळता फिडबॅक मिळाल्यानंतर Amazon नं आपल्या अॅप आयकॉनवर असलेल्या निळ्या रिबिनचं डिझाईन पुन्हा बदललं.कंपनीनं जानेवारी महिन्यात आपला एक नवा अॅप आयकॉन आणला होता. नव्या आयकॉननं त्यानंतर जुन्या आयकॉनची जागा घेतली. यामध्ये Amazon च्या बॉक्सवर वरील बाजूला निळी रिबिन आणि त्याच्या खालच्या बाजूला हसण्याच्या आकारात अॅमेझॉनचा आयकॉन आहे. पाच वर्षांमध्ये Amazon नं पहिल्यांदा यात बदल केला होता.
Amazon ने बदलला App आयकॉन; हिटरलच्या मिशांसोबत तुलना करत केलं होतं ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 14:19 IST
Amazon : नेटकऱ्यांनी नव्या आयकॉनची हिटलरच्या मिशांशी तुलना करत केलं होतं ट्रोल
Amazon ने बदलला App आयकॉन; हिटरलच्या मिशांसोबत तुलना करत केलं होतं ट्रोल
ठळक मुद्देनेटकऱ्यांनी नव्या आयकॉनची हिटलरच्या मिशांशी तुलना करत केलं होतं ट्रोलजानेवारी महिन्यात कंपनीनं बदलला होता App आयकॉन